Headlines

WhatsApp ची भन्नाट ट्रिक! डिलीट केलेले मेसेज सहज वाचणे शक्य, जाणून घ्या डिटेल्स

[ad_1]

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर कोट्यावधी यूजर्स करतात. भारतात देखील या अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. केवळ चॅटच नाही तर फोटो-व्हिडिओ पाठवण्यापासून ते कॉलिंगसाठी देखील या अ‍ॅपचा वापर केला जातो. WhatsApp आपल्या यूजर्ससाठी अनेक शानदार फीचर्स असते. असेच एक फीचर्स आहे डिलीट मेसेज. यूजर्स आपण पाठवलेला मेसेज एका ठराविक कालावधीमध्ये डिलीट करू शकतात. डिलीट केलेला हा मेसेज समोरील व्यक्ती परत पाहू शकत नाही. कारण, यासाठी ऑफिशियल अ‍ॅपमध्ये कोणतेही फीचर दिलेले नाही. परंतु, यूजर्स एका सोप्या ट्रिकचा वापर करून डिलीट झालेले मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ पाहू शकतात. ही ट्रिक काय आहे जाणून घेऊया.

वाचा: रशिया-युक्रेन युद्धाचा फटका, स्मार्टफोन आणि लॅपटॉपसह या वस्तू महागणार?, पाहा डिटेल्स

हे अ‍ॅप करावे लागेल डाउनलोड

एखाद्या यूजरने मेसेज करून काही सेकंदातच डिलीट केल्यानंतर, तो मेसेज नक्की काय होता याबाबत आपल्या मनात उत्सुकता येते. मात्र, हा मेसेज पाहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कोणतेही फीचर नाही. यासाठी तुम्हाला हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. यासाठी तुम्हाला एक थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. सर्वात प्रथम व्हॉट्सअ‍ॅप डिलीट अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. डाउनलोड केल्यानंतर येसवर क्लिक करा. त्यानंतर अ‍ॅपला परवानगी द्यावी लागेल. अ‍ॅपला परवानगी दिल्यानंतरच हे व्यवस्थित काम करेल.

अ‍ॅपला परवानगी दिल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर काही सेटिंग्स कराव्या लागतील. व्हॉट्सअ‍ॅप उघडून तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्समध्ये डेटा अँड स्टोरेज यूसेज या पर्यायावर क्लिक करा. आता मीडिया ऑटो डाउनलोडवर जाऊन सर्व पर्यायांना अलाउ करा. यामुळे तुमच्या सर्व फाइल्स आपोआप डाउनलोड होतील. त्यानंतर मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओला रिकव्हर करू शकता. आता कोणतीही तुम्हाला पाठवलेला मेसेज, ऑडिओ अथवा व्हिडिओ क्लिप डिलीट केल्यास हे अ‍ॅप ओपन करायचे आहे. व्हॉट्सअ‍ॅप डिलीट अ‍ॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला डिलीट केलेल सर्व मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ दिसतील. हे मेसेज तुम्ही रिकव्हर देखील करू शकता.

वाचा: सार्वजनिक ठिकाणचा वाय फाय वापरण्यापूर्वी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, मोठा फटका बसू शकतो

वाचा: टेक्नो वॉरः रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट बंद , रशियामध्ये टेलिग्रामही ठप्प

वाचा: स्वस्तात जबरदस्त इंटरनेट स्पीड देणारे ‘बेस्ट’ ब्रॉडबँड ऑप्शन्स, सुरुवातीची किंमत ३९९ रुपये

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *