WhatsApp चे हे फीचर माहितेय का? कोणत्याही भाषेत पाठवता येतो मेसेज, पाहा ट्रिक्स


नवी दिल्ली: WhatsApp Users: आजकाल सगळेच नातेवाईकांशी किंवा मित्रांशी मेसेजवर बोलण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापरतात. जर तुम्हीही व्हॉट्सअॅप यूजर असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना बिल्ट-इन ट्रांसलेशन फीचर ऑफर करत आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचा मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत कोणत्याही भाषेत पोहोचवू शकता. म्हणजेच, जर तुम्हाला हिंदी भाषा येत असेल. परंतु, तुम्हाला इंग्रजी किंवा इतर कोणतीही भाषा जाणणाऱ्या तुमच्या मित्राशी किंवा ऑफिसमधील सहकाऱ्याशी बोलायचे असेल तर, तुम्ही ते सहज करू शकता. भाषांतर फीचर वापरण्यासाठी पाहा ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस.

वाचा: या 5G फोनवर ३१ जानेवारीपर्यंत भन्नाट ऑफर, MRP पेक्षा कमीमध्ये खरेदीची संधी

भाषांतर फीचर वापरण्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करावी लागेल.

तुमचे WhatsApp चॅट उघडा आणि एक नवीन मेसेज टाइप करा. आता हा टाईप केलेला मेसेज मेनू येतपर्यंत होल्ड करून ठेवा. आता मेनूमधील ‘अधिक’ पर्याय निवडा. आता भाषांतर पर्याय निवडा. आता तुमच्या समोर एक पॉप-अप विंडो उघडेल ज्यामध्ये तुम्हाला भाषांतरित मेसेज दिसेल. जर तुम्ही पाठवू इच्छित असलेल्या भाषेत मेसेजेसचे भाषांतर केले नसेल, तर युजर्स त्यांना ज्या भाषेत संदेश पाठवायचा आहे ते निवडू शकतात.

तसेच, व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स स्टेटस अपडेट्समध्ये व्हॉइस नोट्सही शेअर करू शकतील. व्हॉईस स्टेटस अपडेट फीचरची माहिती WA BetaInfo या प्लॅटफॉर्मद्वारे देण्यात आली आहे, जी WhatsApp वर येणाऱ्या नवीन फीचर्सचा ट्रॅक ठेवते. WA BetaInfo ने ट्विट करून व्हॉट्सअॅपमधील या नवीन फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. WA BetaInfo नुसार, कंपनी सध्या काही बीटा युजर्ससाठी हे फीचर आणत आहे.

वाचा: Airtel चे धमाकेदार प्लान्स, हॉटस्टारसह भरपूर डेटा आणि मोफत कॉलिंग, किंमत ४०० रुपयांपेक्षा कमी

Source link

Leave a Reply