आता आणखी कारणामुळे Mahesh Babu ट्रोल… काय आहे प्रकरण?


मुंबई :  ‘मला हिंदी सिनेमांच्या अनेक ऑफर येतात, पण बॉलिवूडला मी परवडणारा नाही…’ असं वादग्रस्त वक्तव्य करणारा दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या(Mahesh Babu) विधानाने चित्रपटसृष्टीत एक नवीनच वाद सुरू झाला. मात्र, नंतर महेश बाबूने या विधानाबद्दल माफी मागितली. पण आता महेश बाबू पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. 

सोशल मीडियावर अजूनही महेश बाबूच्या याच विषयावर चर्चा रंगत असताना, पान मसाला ब्रँडचा प्रचार करणार्‍या अभिनेत्याच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेऊन नेटिझन्स अभिनेत्याला ट्रोल करत आहेत.

गेल्या वर्षी, महेश बाबू आणि टायगर श्रॉफसोबत पान मसाला ब्रँड जाहिरातीत एकत्र दिसले. युजर्सनी आता महेश बाबूला त्या जाहिरातीवर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका ट्विटर युजरने लिहिले की, “बॉलिवूडला महेश बाबूला परवडत नाही, पण पान मसाला परवडू शकतो.,,”

दरम्यान, महेश बाबू आदिवी शेषच्या ‘मेजर’ सिनेमाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होता, जिथे तो त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलला. महेशला यावेळ बॉलिवूड पदार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर तो म्हणाला, ‘मला हिंदी सिनेमांच्या अनेक ऑफर येतात, पण बॉलिवूडला मी परवडणारा नाही, आणि ज्यांना मी परवडणार नाही त्यांच्यासोबत मला काम देखील करायचं नाही.’

तो पुढे म्हणाला, ‘मला साऊथमध्ये मिळालेले स्टारडम आणि प्रतिष्ठा खूप मोठी आहे. त्यामुळेच मी माझा  इंडस्ट्री सोडून इतर कोणत्याही  इंडस्ट्रीचा भाग बनण्याचा विचार करत नाही. माझे स्वप्न आता पूर्ण होत आहे आणि मी जास्त आनंदी होऊ शकत नाही.” असं देखील महेश बाबू म्हणाला. Source link

Leave a Reply