Headlines

Web Series 2022: हीतर हद्दच! यंदा दार बंद करुनच पाहा ‘या’ Web Series

[ad_1]

मुंबई : Bold Web Series 2022 गेल्या काही वर्षांमध्ये वेह सीरिजच्या जगतामध्ये काही असेही विषय हाताळले गेले जे सादर करताना त्यामध्ये इंटिमसी आणि बोल्डनेसची हद्द ओलांदडील गेली. यंदाच्या वर्षातही अशाच काही सीरिज प्रेक्षकांच्या येण्यासाठी सज्ज होत आहेत. 

या सीरिज अशा आहेत ज्या एकतर तुम्ही अल्पवयीन मुलांसोबत पाहूच शकत नाही, किंवा मोठ्यांसोबतही पाहताना तुम्हाला बरीच काळजी घ्यावी लागणार आहे. चला पाहूया या सीरिजची नावं… 

आधा इश्क: रोमँटिक थ्रिलर अशा प्रकारात मोडणारी ही वेब सीरिज. या सीरिजमध्ये प्रेमाचा एक त्रिकोण दाखवण्यात आला आहे. शिवाय बरेच बोल्ड सीनही या सीरिजमध्ये आहेत. ज्यामुळं 18 वर्षांगून कमी असणाऱ्यांना ही सीरिज पाहता येणार नाही. 12 मे पासून ही सीरिज प्रदर्शित होत आहे. 

आधा इश्क

एक थी बेगम: पुन्हा एकदा रोमँटिक थ्रिलर प्रकारात मोडणाऱ्या या सीरिजच्या नव्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. पतीच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी एक महिला नेमकी कोणत्या थराला जावू शकते याचं चित्रण सीरिजमध्ये करण्यात आलं आहे. 3 सप्टेंबरला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

एक थी बेगम

द समर आय टर्न्ड प्रिटी: ‘जेनी हान’च्या कादंबरीवर आधारित एक नवी सीरिज ‘द समर आय टर्न्ड प्रिटी’ची घोषणा करण्यात आली आहे. एक तरुणी आणि दोन भावांमध्ये असणाऱ्या प्रेमाच्या त्रिकोणाचं कथानक यामध्ये साकारण्यात आलं आहे. 17 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या सीरिजमध्ये बरेच बोल्ड सीन आहेत. 

द समर आई टर्न्ड प्रिटी

मिर्झापूर 3 : आतापर्यंत दोन पर्व गाजलेल्या या सीरिजचं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रदर्शित होणाऱ्या या सीरिजमध्येही इंटिमेट दृश्यांचा भरणा असणार आहे. 

मिर्जापुर 3

वर्जिन रिवर : रोमान्स आणि सस्पेन्सचा तडका असणाऱ्या या सीरिजची आतापर्यंत 3 पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. पण, याच्या चौथ्या पर्वाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. असं असलं तरीही पहिल्या तीन पर्वांची लोकप्रियता पाहता चौथ्या पर्वातही बोल्ड सीन असण्याचं नाकारता येत नाही. 

वर्जिन रिवर



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *