Headlines

Weather Forecast : पुढील ४-५ दिवस महत्त्वाचे! राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा ताजा अंदाज | weather forecast heavy rainfall in mumbai konkan and central maharashtra next 5 days



राज्यात मागील काही दिवसांपासून पावासाचा (Rain Update) जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, कोकण तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. असे असताना हवामान खात्याने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या मुंबई शहरासह ठाणे आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु आहे.

हेही वाचा >>>> उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का, ठाण्यानंतर नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात सामील होणार?

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आगामी दोन ते दीव दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सध्याचे हवामान लक्षात घेता शेतकरी तसेच चाकरमान्यांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>> शिवसेना म्हणजे भरकटलेलं जहाज, बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार- राधाकृष्ण विखे पाटील

सध्या मुंबई, ठाणे तसेच उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईमधील तिन्ही रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. लोकल रेल्वे उशिराने निघत आहेत. वसई विरारमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील या पावसामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४ हजार ५०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

हेही वाचा >>>> “जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…”, दीपक केसरकर यांचं मोठं विधान

रायगडमध्ये एनडीआरएफची टीम दाखल

रायगडमध्ये मागील दोन ते ती दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे येथील महाड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे मदत तसेच बचावकार्य सुरु असून एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. कोकणात पुढील चार दिवस धोक्याचे असून येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply