Headlines

कोरोनाच्या काळात आपल्याला आपल्या शेतकऱ्यांनी तारले आहे -प्राचार्य साहेबराव देशमुख

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपल्याला आपल्या शेतकऱ्यांनी तारले आहे  त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम करून आपला देश प्रगतीपथावर न्यायचा आहे कोरोना पूर्वी आपल्या भारताचा  जीडीपी दर दहा इतका होता  मात्र कोरोनाचे संकट आले आणि आपल्या देशाचा जीडीपी दर हा  वजा तीन झाला मात्र आपल्या भारतातील शेतमालाच्या उत्पादनाच्या बाबतीत आपल्या देशाचा   जीडीपी दर अधिक तीन आहे त्यामुळे आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांनी आपल्या सबंध भारतातील जनतेला तारले आहे  असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य साहेबराव देशमुख यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे प्रशासना अधिकारी आणि  संचालक श्री आदित्य सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलताना केले .

याप्रसंगी मराठवाडा मुक्ति दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष संस्थेचे प्रशासन अधिकारी आदित्य सुधीर पाटील हे अध्यक्ष होते 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे प्रशासन अधिकारी आदित्य पाटील सर संचालक काका कुलकर्णी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल चे प्रिन्सिपल चतुर्वेदी सर तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कोळी सर उपप्राचार्य घाडगे सर राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक पठाण सर व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी

या प्रसंगी पुढे बोलताना म्हणाले कि आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला पण खऱ्या अर्थानं 13 महिन्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र मिळाले यासाठी मराठवाड्यातील जनतेला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेरा महिने संघर्ष करावा लागला , जो देश इतिहास विसरतो तो त्याचे अस्तित्व विसरतो असे म्हटले जाते त्यामुळे इतिहासाचे यथार्थ ज्ञान असणे प्रत्येक भारतीयाला आवश्यक आहे 15 ऑगस्ट 1947 साली  भारत स्वतंत्र झाला त्या वेळी भारतात 565 संस्थाने होती या 565 संस्थांपैकी भारत सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 562 संस्थाने त्यावेळी भारतात विलीन झाली मात्र तीन संस्थाने भारतात विलीन होण्याकरिता विरोध करत होटी  त्यापैकी अलिगड हैदराबाद आणि कश्मीर ही संस्थाने होती त्याविषयी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व गृहमंत्री पटेल यांनी राहिलेले या तीन संस्थाने भारतात विलीन करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागले .

 काश्मीर चा  राजा हरिहर सिंग यांनी काश्मीर प्रदेश पंडित जवाहरलाल नेहरू यांना लिहून दिला आणि त्या दिवसापासून कश्मीर भारतात विलीन झाला त्यानंतर अलिगढ विलीन झाला मात्र हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नाही या संस्थानात सध्याचे आंध्र आणि तेलंगणा आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यातील  आठ जिल्हे कर्नाटकातील चार  जिल्हे असा भाग होता आणि हा भाग निजामाच्या ताब्यात होता आणि तो निजाम भारतात विलीन व्हायला तयार नव्हता त्यामुळे कर्नाटकातील व्यंकटेश खेडगीकर पुढे आले आणि त्यांनी उस्मानाबाद जवळील हिप्परगे गावातून स्वामी रामानंद हे नाव धरण करून मराठवाडा   मुक्ती संगरामाचा लढा उभा केला.

संपूर्ण हैदराबाद संस्थानात स्वामी रामानंद यांनी निजामाच्या विरोधात फौज उभी केली यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ वीरेंद्र काबरा गोविंद श्राफ साहेबराव परांजपे इत्यादींचा उल्लेख इतिहासात आढळतो आणि त्याच वेळी निजामाचा एक सरदार कासिम रिजवी याने रजाकार ही संघटना उभी केली रजाकार ही संघटना निजामास मदत करत होती आणि लोकांवर अन्याय अत्याचार करीत होते त्यामुळे लोकांनी रजाकार संघटनेला  पळवून लावले तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू आणि सरदार पटेल यांच्या हे लक्षात आलं आणि सरदार पटेल यांनी पोलीस कारवाई करण्याचे ठरवले आणि त्याला मिशन पोलो असं नाव देण्यात आलं याला हैदराबाद संस्थानात पोलीस कारवाई असं म्हटलं जातं या पोलिस कारवाई मध्ये मराठवाड्याच्या चार ही दिशा कडून भारतीय फौजांनी आगेकूच केली आणि निजामाचा पराभव केला सुरुवातीस निजामाचा सरदार शरण आला आणि त्यानंतर निजाम ही शरण आला व त्यांनी शरणागती पत्करली याकरिता तेरा  महिन्याचा कालावधी गेला पहिल्या स्वातंत्र्यानंतर तेरा महिन्याच्या संघर्षानंतर मराठवाड्यात स्वातंत्र्य मिळाले त्यास मराठवाडा मुक्ती संगर्म दिन म्हणून आपण साजरा करत आहोत

आपण हा विचार करायला हवा की जर निजामाने शरणागती पत्करली नसते आणि भारतात विलीन झाला नसता तर भारताचा नकाशा आपल्याला कसा दिसला असता भारताच्या मधोमध निजामशाही आणि निजामाला पाकिस्तान अगदी जवळचा तर आपला भारत देश यांच्या मधोमध निजाम हा विचार करून आपल्या भारताचा नकाशा कसा दिसला असता त्याचा विचार करावा सध्या अफगाणिस्तानला जो त्रास झाला आहे तसा त्रास आपल्याला झाला असता निजाम भारतात विलीन झाला म्हणजेच मराठवाडा मुक्त झाला म्हणून आपण आपल्या भारत देशात म्हणून सुरक्षित आहोत.

अशा  या मराठवाडा प्रदेशात जमिनी जिरायती आहेत शेती पावसावर अवलंबून आहे जनता गरीब आहे पण प्रामाणिक आहे शिक्षणाचा विकास इतकासा  आजही झालेला नाही पण  जायकवाडी सारखे प्रकल्प उभा राहिला आहे काही प्रकल्प नव्याने साकारत साकारत  आहेत शिक्षणा प्रमाणे  इतर विभागात या भागाचा विकास होतो आहे परंतु या विकासाच्या वाटेवर आपला देश चालत असताना आपल्या देशाची गणना प्रगतशील देशात होत होती  आणि आपल्या सर्व जगावर कोरोनाचे संकट आले आणि जगाची प्रगती थांबली त्या सोबत आपल्या भारताची हि प्रगती थांबली आहे कोरोनाच्या या काळात  आपल्या देशाचा जीडीपी दहा वरून वजा तीन वर आला आहे मात्र शेती क्षेत्राचा जीडीपी हा अधिक तीन वर आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्याला तारले आहे शेतकर्य प्रमाणे आपण भारतातील प्रत्येक नागरिकांनी आपले काम प्रामाणिकपणे मन लावून केल्यास आपल्या भारत देश निश्चित प्रगतीपथावर आपल्याला नेता येईल आणि आपला भारत देश जगात एक ताकद म्हणून भरलेला दिसेल

    सदर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमाचे आयोजन श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये करण्यात आले होते. ध्वजारोहण प्राचार्य साहेबराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत,ध्वजगीत, मराठवाडा गौरवगीत इ.गीते सादर करण्यात आली. याला साथ संगीत शिक्षक महेश पाटील यांनी दिली. प्रसंगी विज्ञान विभागाच्या फोटॉन बॅच JEE परीक्षेत उत्तीर्ण व अडव्हांस परीक्षेसाठी पात्र अशा ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाटील सागर संजय, हिप्पर्गेकर शंतनु रवींद्र, पंचाळ सागर श्रीकृष्ण, भिरंगे आमेय विकास, दहातोंडे तनया बालाजी, सदाफुले मधुमती शरद. इ.विद्यार्थ्यांना सत्कारित करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचा सदस्य आणि  प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील, राष्ट्रीय आदर्श शिक्षक वाय.के.पठाण , प्राचार्य एस एस देशमुख, उपप्राचार्य एस के घार्गे, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी

सर्व पर्यवेक्षक, सर्व शाखेचे विभाग प्रमुख, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी गोरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुर्यकांत कापसे यांनीकेले. तर आभार प्रा.नंदकुमार नन्नवरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *