Headlines

वर्धा : पूरग्रस्तांना आधी मदत मग पुनर्वसन ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही | Deputy Chief Minister Fadnavis testimony that flood victims should be helped first and then rehabilitated amy 95

[ad_1]

वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिंगणघाट जिल्ह्यातील कान्होली गावास पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी कान्होली गावास भेट दिली. पूरग्रस्त गावकऱ्यांनी यावेळी मदतीसाठी आक्रोश केला. यावर, पूरग्रस्तांना आधी अधिकाधिक आर्थिक मदत दिल्या जाईल, त्यानंतर त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम हिंगणघाट येथे पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यानंतर त्यांनी कान्होली गावास भेट दिली. येथील पुरग्रस्तांची ग्रामपंचायत इमारतीत सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी गावकऱ्यांनी मदतीसाठी आक्रोश केला. वारंवार पूर येतो, दरवर्षी आम्हाला स्थलांतर करावे लागते. त्यामुळे कायमस्वरूपी पुनर्वसन करून द्या, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली. त्यावर ते करूच, पण त्यास वेळ लागतो. सध्या आर्थिक मदत देणे महत्त्वाचे आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मात्र, यानंतरही ग्रामस्थांनी पुनर्वसनाचीच मागणी लावून धरली. हे पाहता खा. रामदास तडस आणि आ. समीर कुणावर यांनी हस्तक्षेप करीत ग्रामस्थांना समजावले. शेवटी ही बाब अग्रक्रमाने घेण्याची सूचना फडणवीस यांना करावी लागली. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी खा. तडस, आ. रामदास आंबटकर, आ. रणजित कांबळे, आ. कुणावार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याशी चर्चा केली.

यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी हिंगणघाट येथील महाकाली नगर येथे भेट दिली. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झाले. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेती आणि तुडुंब वाहणाऱ्या नदीपात्राची उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *