वयाच्या पंच्याहत्तरी गाठणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीचं लग्नानंतरही अफेअर, अनेक वर्षांनी अखेर खुलासा


मुंबई : इंडस्ट्रीतील कायम चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे अफेअर… आज अनेक प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण लग्नाआधी आणि लग्नानतंर सेलिब्रिटींची असणारी अफेअर कायम चर्चेत असातात. ज्या अभिनेत्रीने अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर चाहत्यांच्या मनात अनेक वर्ष राज्य केलं. त्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या अफेअरबद्दल अनेक वर्षांनी सत्यसमोर आलं आहे. त्या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून मुमताज (Mumtaz) आहेत. 

फिरोज खान आणि शम्मी कपूर यांसारख्या स्टार्समुळे त्या खूप चर्चेत होत्या. अलीकडेच ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुमताज यांनी फिरोज खानसोबतच्या  नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले.

जेव्हा त्यांना विचारण्यात आलं, ‘तुम्ही फिरोज खान यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता का?’ यावर मुताज यांनी सांगितले की, ‘तेव्हा फिरोज एका अँग्लो-इंडियन मुलीच्या प्रेमात होते, परंतु दोघेही परस्पर संमतीने काही काळानंतर वेगळे झाले.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘फिरोज यांनी माझ्यासमोर कधीही लग्नाचा प्रस्ताव ठेवला नाही. आम्ही फक्त चांगले मित्र होतो. एका अँग्लो इंडियन मुलीवर त्यांचं प्रेम होतं. पण ते दोघे का वेगळे झाले ते मला माहीत नाही.

‘त्या मुलीपासून विभक्त झाल्यानंतर फिरोज आणि मी चांगले मित्र झालो. ते सगळ्याचं गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. त्यांनी कधीचं खासगी गोष्टी इतरांना सांगितल्या नाहीत. त्या माझ्यासोबत रडले देखील आहेत.’

लग्नाबद्दल मुमताज म्हणाल्या, ‘फिरोज खानशी लग्न करणं कठीण होतं आणि मला ते नको होतं. जर मी त्यांच्याशी लग्न केले असतं तर आमचे नातं फार काळ टिकले नसतं. आमची मैत्रीही तुटली असती.’

सांगायचं झालं तर, 1974 मध्ये मुमताज यांनी उद्योगपती मयूर माधवानीसोबत लग्न केलं. यानंतर त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकलं. मुमताजला नताशा आणि तान्या या दोन मुली आहेत.Source link

Leave a Reply