वयाच्या 44 व्या वर्षी अभिनेत्याला भेटली हमसफर; वय सर्वकाही नसतं, त्यानं दाखवून दिलं


मुंबई : Kasauti Zindagi Kay Cezanne Khan Marriage Plan:  मालिकांची लोकप्रियता परमोच्च शिखरावर असतानाच एक चेहरा चाहत्यांच्या भेटीला आला आणि सर्वांच्या जवळचा झाला. त्याचं हसणं, त्याचं वावरणं आणि चालणं बोलणं सर्वांच्या मनाचा ठाव घेऊन गेलं. 

तेव्हापासून ते य़अगदी आतापर्यंत प्रत्येक चाहत्याच्या मनात या अभिनेत्यानं असं काही घर केलं, की इतकी वर्षे उलटूनही त्यांच्या मनातील या अभिनेत्याचं स्थान आणि त्याच्यासाठीचं प्रेम काही कमी झालेलं नाही. 

वयाच्या 44 व्या वर्षी हा अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यामुळं वाढतं वय आणि त्याचा आकडा सर्वकाही नसतं हेच त्यानं दाखवून दिलं. 

हा अभिनेता आहे, सिझेन खान (Cezanne Khan). हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं हा खुलासा केला. खासगी आयुष्याबाबतही सिझेन यावेळी खुप काही बोलला. 

प्रेयसी अफसीन हिच्याशी लग्न करण्यासाठी आपण आता सज्ज असल्याचं त्यानं सांगितलं. 

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत त्यानं साकारलेला अनुराग, आजही चाहत्यांच्या नजरेत कायम आहे. म्हणूनच त्याच्या लग्नाची बातमी कळताच चाहत्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

अफसीन ही सिझेनहून 3 वर्षांनी लहान आहे. ती उत्तर प्रदेश येथील अमरोहा येथे राहणारी असून, बिर्याणी अतिशय उत्तम बनवते असं तो सांगतो. 

बिर्याणी खाऊनच सिझोननं अफसीनवर असणारं प्रेम व्यक्त केलं होतं, असं त्यानं सांगितलं. 

Shweta Tiwari's 'Kasautii Zindagii Kay' co-star Cezanne Khan reveals plans  to get married in 2021

जवळपास 3 वर्षांपासून तो रिलेशनशिपमध्ये आहे. कोरोनाचं संकट आलं नसतं तर, आपण केव्हाचेच लग्न करुन मोकळे झालो असतो असंही त्यानं मुलाखतीत सांगितलं. 

वयाच्या या टप्प्यावर इतक्या उशिरानं लग्न करण्याचा निर्णय़ घेण्याबाबत आपण अतिशय सोज्वळ आणि कुटुंबवत्सल मुलीच्या शोधात असल्याचं त्यानं सांगितलं.Source link

Leave a Reply