वयाच्या 21 व्या वर्षी सुहाना इतकी बोल्ड कशी? तरुणींनो हे तुम्हालाही शक्य


Suhana Khan Photo: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) या सेलिब्रिटी जोडीची मुलगी, सुहाना खान लवकरच मोठ्या पडद्यावर पडद्यावर पदार्पण करणार आहे. नेटफ्लिक्सच्या The Archies या चित्रपटातून ती इतर स्टारकिड्सच्या सोबतीनं स्क्रीन शेअर करणार आहे. 

वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी सुहानाचा फिटनेस आणि तिची अदा पाहता इतक्या कमी वयात ती हे सौंदर्य जपते तरी कसं? हा प्रश्नही सर्वांनाच पड़तो. तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर ठाऊक करुन घ्यायचंय? 

सुहाना खान (Suhana Khan)ची ट्रेनर रूपल सिद्धपुरा फारियानं एक फोटो नुकताच शेअर केला आहे. या फोटोमुळे तर, सुहानावरून नजर हटणं कठीण. या फोटोमध्ये ती दोन्ही हातांच्या बळावर शरीराचा भार उचलताना दिसत आहे. 

योगाभ्यासानुसार या प्रकाराला बकासन असं म्हणतात. सुहाना हे आसन करताना तिच्या शरीराला अतिशय सुरेखरित्या हातांच्या आधारे वर उचलताना दिसत आहे. 

योगा करतेवेळी तिनं काळ्या रंगाच्या आऊटफिटला पसंती दिली. ज्यामध्ये स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्स असा तिचा लूक दिसत आहे. 

सुहाना कशी घेते स्वत:ची काळजी? 
सुहानाची एकंदर शरीरयष्टी आणि तिच्या चेहऱ्यावर असणारी लकाकी पाहताना त्यासाठीही ती घेत असणारी मेहनत लगेचच लक्षात येते. योग्य तो व्यायाम, आहाराच्या सवयी आणि त्यातही शरीराच्या क्षमतेनुसार काही गोष्टींची निवड करण्यवर तिचा कायम भर असतो. 

सुहानाचा कोणताही फोटो पाहा, त्यामध्ये तिचा आत्मविश्वास आणि शरीरयष्टी मन जिंकून जाते. स्वत:च्या शरीराला महत्त्वं देत त्या शरीरावर प्रेम करण्याची कलाच जणू सुहाना सर्वांना शिकवते. Source link

Leave a Reply