Headlines

Voter ID Card मध्ये असे दुरुस्त करा चुकीचे नाव, घर बसल्या होईल काम, पाहा प्रोसेस

[ad_1]

नवी दिल्ली: Voter ID Card Name Changer: देशात मतदानासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक कागदपत्र आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मतदार ओळखपत्र हे भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांना दिलेले फोटो ओळखपत्र असून त्याला मतदार ओळखपत्राला इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) असेही म्हणतात. हे अत्यावश्यक ओळखपत्र म्हणूनही काम करते. पण, अनेक वेळा मतदार ओळखपत्रावर मतदाराचे चुकीचे नाव छापले जाते. ज्यामुळे नंतर समस्या येतात. तुमच्‍या मतदार कार्डावरही चुकीचे नाव असल्‍यास, तुम्‍ही ते सहज दुरुस्‍त करू शकता. आज आम्ही तुम्हाला मतदार ओळखपत्रातील चुकीचे नाव घरबसल्या ऑनलाइन कसे दुरुस्त करता येईल याबद्दल सांगणार आहोत.

वाचा: Smartphone Launch: iPhone सारखा दिसणारा स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत ८ हजार, फीचर्स दमदार, पाहा डिटेल्स

मतदार ओळखपत्रात नाव कसे दुरुस्त करायचे ते जाणून घ्या:

सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल किंवा NSVP च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर येथे दर्शविलेल्या वोटर पोर्टलवर क्लिक करा. आता तुम्हाला (https://voterportal.eci.gov.in/) वर पुनर्निर्देशित केले जाईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थेट मतदार पोर्टलवरही जाऊ शकता. नंतर पोर्टलवर तुमचे नाव आणि पासवर्डसह नोंदणी करा. तुम्ही आधीच सदस्य असाल तर लॉगिन करा. यानंतर Correction in Voter Id हा पर्याय निवडा. त्यानंतर नेम ऑप्शनमधील करेक्शन वर टॅप करा. तुमचा विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघ निवडा. त्यानंतर तुमचे नाव, वय, लिंग आणि मतदार यादीचा भाग क्रमांक टाका.

वाचा: Charging Devices: तुमचा स्मार्टफोन १० वेळा चार्ज करू शकतात ५०००० mAh बॅटरीचे ‘हे’ मजबूत पॉवर बॅंक्स

याशिवाय, बॉक्समध्ये तुमचा पत्ता भरा आता पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा गॅझेट यांसारख्या आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त तुमचा फोन नंबर आणि ईमेल सारखी आवश्यक कागदपत्रे भरा. Declaration फिल करा आणि प्रिव्यू करून Submit करा. मतदार ओळखपत्रातील नाव बदलण्याचे स्टेटस ट्रॅक करण्यासाठी घेण्यासाठी Reference ID केला जाईल. ज्याद्वारे तुम्ही भविष्यात तुमच्या अर्जाचा मागोवा घेऊ शकता. यानंतर, जर तुमचा व्हेरिफाय आणि प्रोसेस झाला. तर, तुमच्या Registreed Number वर एक मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या स्थानिक निवडणूक कार्यालयात जाऊन तुमच्या नवीन नावासह नवीन मतदार ओळखपत्र कलेक्ट करू शकता.

वाचा: Ration Card Online: थेट घरी येईल रेशन कार्ड ,असा करा ऑनलाईन अर्ज, प्रोसेस आहे खूप सोपी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *