Headlines

वीटलेय मी ऐकून, माझ्या पाठीमागे…. ; बॉडी शेमिंगमुळं अभिनेत्रीच्या सहनशीलतेचा अंत

[ad_1]

मुंबई : सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर एक फोटो जरी पोस्ट केला तरी त्यावर क्षणार्धात लाखो लाईक, हजारो कमेंट्स येतात. हा फोटो बघता बघता तुफान व्याहरल होतो. पण, फोटो पाहून येणाऱ्या सर्वच प्रतिक्रिया सकारात्मक असतात असं नाही. बऱ्याच सेलिब्रिटींना सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टसाठी अनेकदा ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागतं. काहींना कमरेखालचे विनोद आणि टीप्पण्याही झेलाव्या लागतात. 

शेवटी तीसुद्धा माणसंच ना…. आपल्याबद्दल वारंवार होणारी ही वक्तव्य आणि त्यामुळं होणारा हा मनस्ताप कधी ना कधी टोकाशी जाणारच. असंच एका अभिनेत्रीसोबत झालं आहे. 

तिच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, आता या सर्व प्रकरणावर ती मोकळेपणानं बोलताना दिसत आहे. ही अभिनेत्री आहे, अर्शी खान. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळं अर्शी प्रसिद्धीझोतात आली. (Bigg boss arshi khan)

बॉडी शेमिंग तिलाही चुकलेलं नाही. पण, यासंदर्भातच व्यक्त होत ती म्हणते, ‘माझ्या मते बॉडी शेमिंग हा विनयभंग आणि अपमानाचाच एक प्रकार असू शकतो. मी आता हे सहन करुन करुन थकलेय. लोकं माझी पाठ आणि पाठीच्या आकारावरही प्रतिक्रिया देत असतात.’

एकदा आपल्याला कास्टींग डायरेक्टरनं अशा अभिनेत्रींमध्ये सहभागी व्हायला सांगितलं होतं, ज्या इतरांसमोर फिगर फ्लाँट करतात. पण, आपण आपल्या दिसण्यानं आणि व्यक्तीमत्वानं कायम आनंदात असतो असं म्हणत अर्शीनं खिल्ली उडवणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली. 

ही लोकं आहेत तरी कोण, त्यांच्या बोलण्याचा मी इतका विचारच का करतेय असं म्हणत तिनं मी मेहनत आणि जिद्दीच्या बळावर लक्ष्य गाठण्यास समर्थ असल्याचा दावा केला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *