विराट कोहलीच्या फ्लॉप शोनंतर अनुष्का शर्मा ट्रोल, पाहा नेमकं काय प्रकार


मुंबई : आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा आणि रेकॉर्ड करणाऱ्या कोहलीसाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम खास ठरला नाही. कोहलीच्या बॅटमधून सुरुवातीसारख्या धावा निघताना दिसत नाहीत. त्यामुळे चाहत्यांची खूप मोठी निराशा झाली आहे. कोहलीला खेळताना क्रिकेटप्रेमींना पाहायचं आहे. 

 

कोहली सतत फ्लॉप होत असल्याने आता नेटकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोहली गोल्डन डक झाल्यानंतर त्याला ट्रोल करण्याऐवजी लोकांनी अनुष्का शर्माला या सगळ्यात ओढलं. 

 

अभिनेत्री आणि कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. कोहलीच्या फ्लॉप शोला अनुष्का शर्मा जबाबदार असल्याचं ट्रोलर्सचं म्हणणं आहे. काही चाहते अनुष्काला सपोर्ट करत असल्याचं देखील सोशल मीडियावर पाहायला मिळालं. 

 

हैदराबादच्या मार्को जॅन्सेनने बंगळुरुच्या 3 फलंदाजांचा काटा काढला. विशेष म्हणजे या 3 पैकी 2 फलंदाजांना त्याने शून्यावर आऊट केलं. जॅन्सेनने दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर कॅप्टन फॅफ डु प्लेसीसला आऊट केलं. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विराट कोहलीला गोल्डन डक (पहिला बॉल) करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. 

 

हैदराबाद टीमने बंगळुरूचा 9 विकेट्सने पराभव केला. बंगळुरूसाठी यंदाच्या हंगामातील हा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. या पराभवानंतर फाफ ड्यु प्लेसीस संतापल्याचंही पाहायला मिळालं. 



Source link

Leave a Reply