Virat Kohli | विराट पुन्हा फेल, सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट


मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 36 वा सामना आरसीबी विरुद्ध एसआरएच (RCB vs SRH) यांच्यात खेळवण्यात येत आहे. हैदराबादने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादचा फिल्डिंग करण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. एसआरएचच्या गोलंदाजाने आरसीबीला दुसऱ्याच ओव्हरमध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 झटके दिले. (rcb vs srh ipl 2022 virat kohli out on golden ducks against surisers hyderbad after lsg lucknow marco jansen take 3 wickets in an over) 

हैदराबादच्या मार्को जॅन्सेनने सामन्यातील दुसऱ्या आणि आपल्या कोट्यातील पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये त्याने बंगळुरुच्या 3 फलंदाजांचा काटा काढला. विशेष म्हणजे या 3 पैकी 2 फलंदाजांना त्याने शून्यावर आऊट केलं.

जॅन्सेनने दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर कॅप्टन फॅफ डु प्लेसीसला (Faf Du Plesis) आऊट केलं. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विराट कोहलीला (Virat Kohli) गोल्डन डक (पहिला बॉल) करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. 

तर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अनुज रावतलाही भोपळा फोडून दिला नाही. अशा प्रकारे जॅन्सेनने एकाच ओव्हरमध्ये आरसीबीच्या स्टार फलंदाजांना आऊट केलं. 

विराट सलग दुसऱ्यांदा शून्यावर आऊट

विराटची या मोसमात सलग शून्यावर आऊट होण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी विराट लखनऊ विरुद्धच्या सामन्यातही भोपळा न फोडता आऊट झाला होता. विशेष म्हणजे विराट लखनऊ आणि आताच्या हैदराबाद विरुद्धच्या या दोन्ही सामन्यात पहिल्याच बॉलवर आऊट झाला. 

विराटची आयपीएलच्या इतिहासात शून्यावर आऊट होण्याची पाचवी वेळ ठरली. विराट लखनऊ विरुद्धच्या सामन्याआधी आयपीएलमध्ये अखेरचा 2017 ला झिरोवर आऊट झाला होता.

विराट कधी आणि कोणाविरुद्ध गोल्डन डक?

मुंबई – 2008- बॉलर-आशिष नेहरा

केकेआर-2014-बॉलर-संदीप शर्मा

केकेआर-2017-बॉलर-नॅथन कुल्टर नाईल 

एलएसजी-2022-बॉलर-दुष्मंता चमीरा

एसआरएच-2022-बॉलर-मार्को जॅन्सेन

विराटची 15 व्या मोसमातील कामगिरी

विराटला आयपीएलच्या 15 व्या मोसमात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. विराटने या मोसमात आतापर्यंत एकूण 8 सामन्यात अनुक्रमे  41*, 12, 5, 48, 1, 12, 0, 0 अशा धावा केल्या आहेत.
 
एसआरएच प्लेइंग इलेव्हन : केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, जगदीशा सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को यानसन, टी नटराजन आणि उमरान मलिक.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कॅप्टन), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदु हसारंगा, हर्षल पटेल, जॉश हेजलवुड आणि मोहम्मद सिराज.Source link

Leave a Reply