Virat Kohli विराट कोहलीने परिधान केलेल्या या टी-शर्टची किंमत किती आहे? चाहते म्हणतात EMI वर घ्यावा लागेल


Virat Kohli Dress Price: टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) न्यूझीलंड दौऱ्यातून (New Zealand Tour) ब्रेक घेतला आहे. सध्या तो आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतोय. पत्नी अनुष्का शर्मा (Anushka sharma) आणि लेक वामिका (Vamika) यांच्यासह विराट सध्या उत्तराखंडमध्ये आहे. अनुष्कानं विराटच्या शतकी खेळीनंतर बाबा नीम करोली यांचा एक फोटो शेअर केला होता. पतीच्या चांगल्या कामगिरीसाठीच प्रार्थना केली होती. हे मागणं पूर्ण झाल्याच्या निमित्तानंच विराट-अनुष्काने आश्रमाची वाट धरली. 

विराट कोहलीचं महागडं टी-शर्ट
विराट कोहलीचा मोठा चाहता वर्ग आहे. देशातच नाही तर परदेशाताही त्याचे अनेक चाहते आहेत. विराटचा लूक, त्याची हेअरस्टाईल, त्याचे कपडे याविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.  विराट कोहलीचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या टी-शर्टच्या किंमतीने सर्वांनाच आकर्षित केलंय.

विराटने शेअर केला फोटो?
विराटने मंगळवारी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत विराटने एक आकर्षक टी-शर्ट (T-Shirt) परिधान केलं आहे. हाताने विणलेलं (Hand-Knitted) हे टी-शर्ट असून यात अनेक रंग आहेत. अनेक चाहत्याने विराटच्या या लूकचं कौतुक केलं आहे. काही लोकांनी तर या टी-शर्टची किंमत आणि कोणत्या कंपनीचा आहे याचाही शोध घेतला आहे.

लोकं म्हणतात EMI वर घ्यावा लागेल
विराटचा या टी-शर्टमधल्या फोटोला आतापर्यंत 2.6 लाखाहून अधिक युजर्सने लाईक केलं आहे. तर 13 हजारहून अधिक जणांनी ही पोस्ट रिट्विट केली आहे. काही युजर्सने या टी-शर्टची किंमत किती आहे याचाही शोध लावला आहे. ऑनलाईन शॉपिंग अॅपवर या टी-शर्टची किंमत 9999 इतकी आहे. विशे म्हणजे टी-शर्ट विकत घेण्यासाठी EMI चा पर्यायही उपलब्ध आहे. 

100 मिलियन फॉलोअर्ससह चौथा खेळाडू
इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा विराट कोहली (Virat Kohli) जगातील चौथा खेळाडू आहे. ही कामगिरी करणारा तो जगातील 23 वा व्यक्ती आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो (266 दशलक्ष), लिओनेल मेस्सी (186 दशलक्ष) आणि नेमार (147 दशलक्ष) हे फुटबॉल स्टार आहेत. क्रिकेट विश्वात विराट हा पहिला खेळाडू आहे ज्याने 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले.

एका पोस्टसाठी कोहलीला मिळतात करोडो रुपये
विराट कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी1 कोटी रुपये घेतो. विराट कोहलीच्या प्रायोजित पोस्टबद्दल बोलायचे झाले तर त्याला प्रत्येक पोस्टवरून सुमारे 3 कोटी रुपये मिळतात. Source link

Leave a Reply