Virat Kohli: किंग कोहलीच्या कमबॅकचं रहस्य काय? विराटने ‘या’ 3 लोकांना दिलं क्रेडिट!


Virat Kohli Century: बिचारा शुभमन गिल… कधीच्या काळात संधी मिळाली, शतक पण ठोकलं… मात्र, विराटने सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलं. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळेल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात किंग कोहलीने 166 धावांची वादळी खेळी केली आणि रनमशिन (Run Machine) का म्हटलं जातं, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. विराटच्या वादळासमोर शुभमनचं (Shubman Gill century) शतक फिक्क दिसून आलं. मात्र, विराटने पुन्हा एकदा नावाला साजेरी कामगिरी करून दाखवली आहे. (virat kohli credits india throwdown specialists for giving batters world class practice next assignment india marathi news)

कोहली ‘विराट फॉर्म’मध्ये परत आलाय. चार सामन्यामध्ये तीन शतक ठोकणाऱ्या विराटच्या कमबॅकचं (Virat Kohli Comeback) रहस्य काय?, असा सवाल उपस्थित होत असतानाच त्याने स्वत:चा याचं उत्तर दिलंय. त्यावेळी त्याने अशा तीन लोकांचं नाव (India Throwdown Specialists) घेतलंय, ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल. विराट कोहलीने आपल्या फॉर्मचे श्रेय डी राघवेंद्र (Raghavendra), नुवान सेनेविरत्ने (Nuwan Seneviratne) आणि दयानंद गरानी (Dayanand Garani) या थ्रोडाऊन त्रिकूटाला दिलं आहे.

काय म्हणाला विराट?

या तिघांनी आम्हाला जागतिक स्तरावर सराव करायला लावला. नेटमध्ये 145 किंवा 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांप्रमाणे ते आमची परीक्षा घेतात. ते नेहमी आम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न करतात आणि नियमितपणे आमची चाचणी घेऊन आमच्या फॉर्मची खात्री करतात, असं विराट (Virat Kohli) म्हणतो.

कधीकधी त्याची परिक्षा खूप कठोर वाटते. खरं सांगायचं तर, मला माझ्या करिअरमधील फरक जाणवतोय. मी क्रिकेटपटू म्हणून अशा प्रकारचा सराव (Net Practice) सुरू केला तेव्हा मी कुठे होतो आणि आता कुठे आहे, असं म्हणत विराटने भावनांना मोकळीस दिली.

आणखी वाचा – India vs Sri Lanka 3rd ODI: जेव्हा ‘विराट’ क्रीझवर असतो तेव्हा…, कोहलीच्या नावावर 10 दमदार रेकॉर्ड, पाहा यादी

दरम्यान, यंदाच्या वर्षाची खूप छान सुरुवात झाली आहे. असं वर्ष सुरू करून खूप दिवस झालेत. मालिकेत शतक आणि त्यानंतर दोन शतके झळकावली. मला आनंद आहे की, मी वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) वर्षात अशी सुरुवात करू शकलो आणि मला माहित आहे की, मी ते करत राहू शकेन. जेव्हा मी असा खेळ सुरू करतो आणि मला आत्मविश्वास वाटू लागतो, तेव्हा गोष्टी सहसा चांगल्या होतात, असंही विराट यावेळी म्हणाला आहे.Source link

Leave a Reply