Headlines

Virat Kohli | शानदार कोहली, श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

[ad_1]

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (India vs Sl 2nd Test Match) 23 धावा करुन तंबूत परतला. मात्र या खेळीसह विराटने रेकॉर्ड ब्रेक कारनामा केला. विराटने माजी दिग्गजाचा विक्रम मोडित काढला. विराटने 23 वी धाव घेताच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ (Mark Waugh) याला पछाडलं. (ind vs sl 2nd test team india virat kohli break australia former cricketer mark waugh test runs record at  bengaluru) 

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये धावांबाबत वॉला मागे टाकलं. विराटच्या नावे या दुसऱ्या सामन्याआधी एकूण 100 सामन्यांमध्ये 8 हजार 7 धावांची नोंद होती. त्यामुळे विराटला वॉ ला मागे टाकण्यासाठी 23 धावा हव्या होत्या.

विराटने 23 धावा पूर्ण करताच वॉ ला मागे टाकलं. विराटने 101 व्या सामन्यात ही कामगिरी केली. मार्क वॉने 128 कसोटी सामन्यांमध्ये 8 हजार 29 धावा केल्या आहेत. तर विराटने आतापर्यंत 8 हजार 30 धावा केल्या आहेत.

निराशाजनक सुरुवात

बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. टीम इंडियाने पहिले 2 विकेट्स 29 धावांच्या मोबदल्यात झटपट गमावले. आधी गडबडीत मयंक अग्रवाल 4 धावा करुन रनआऊट झाला. 

तर यानंतर कॅप्टन रोहित शर्मा 15 रन्स करुन माघारी परतला. मात्र त्यानंतर विराट आणि हनुमा विहारीने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही विशेष असं काही करता आलं नाही. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. 

श्रीलंका प्लेइंग XI | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो आणि प्रवीण जयविक्रमा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *