Headlines

Virat Kohli : संतापलेल्या विराटला Rohit Sharma ने केलं शांत; ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

Virat Kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना दिल्लीमध्ये खेळवला जातोय. यामध्ये ऑस्ट्रेलियाप्रमाणेच, टीम इंडियाच्या फलंदाजांची अवस्था पहायला मिळाली. टीम इंडिया (Team India) अवघ्या 262 रन्सवर ऑल आऊट झाली. या सामन्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) चांगला खेळ करण्याची अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही. या सामन्यामध्ये विराट 44 रन्सवर आऊट झाला. मात्र यावेळी विराटच्या विकेटवरून मोठा वाद झालेला दिसून आला.

Virat Kohli च्या विकेटवरून वाद

दिल्लीतील अरूण जेटली स्टेडीअम सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याच्या आरोप या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याप्रकरणी विराट चांगलाच संतापला आहे. थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाच्या पहिल्या डावात ही घटना घडली.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका बॉलवर पहिल्या मैदानी अंपयारने एलबीडब्ल्यू आऊट दिलं. यावेळी विराटने (Virat Kohli) रिव्ह्यू घेतला. त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) यांनी त्याला आऊट घोषित केलं. रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे.

रोहित शर्माने संतापलेल्या विराटला केलं शांत

अंपायरच्या या निर्णयानंतर विराट कोहली (Virat Kohli) काही प्रमाणात नाराज दिसून आला. मैदानातून पव्हेलियनमध्ये परतत असताना तो संतापलेला असल्याचंही दिसून आलं. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माशी विराट चर्चा करताना दिसतोय. यामध्ये विराट, रोहितला बॉल पहिल्यांदा बॅटला लागली असल्याचं सांगतोय. शिवाय रोहित देखील होकारार्थी मान हलवून त्याला प्रतिसाद देतोय. रोहित शर्माच्या प्रतिसादानंतर विराट देखील काहीसा शांत झाल्याचं दिसतंय.

छोले भटुरे पाहतात खूश झाला विराट

आजच्या सामन्यामध्ये विराटच्या विकेटवरून वाद झालेला दिसून आला. दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याच्या आरोप या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याप्रकरणी विराट चांगलाच संतापला होता. यावेळी डगआऊटमध्ये येऊन देखील तो कोच राहुल द्रविड यांना त्याच्या विकटेबद्दल सांगत होता, याचवेळी मागून एक व्यक्ती कोहलीला खाण्यासाठी पदार्थ घेऊन येते.

खाण्याचे पदार्थ पाहताच कोहली अगदी एका लहान बाळासारखा खूश होताना दिसतोय. दरम्यान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओनुसार, विराट कोहलीसाठी आणलेला हा खाण्याचा पदार्थ छोले भटुरे होते. हे छोले भटुरे पाहून विराट इतका खुश झाला की, त्याला पाहून कोच राहुल द्रविड देखील हसू रोखू शकला नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *