Headlines

विराट खोटं नावं वापरून…; टीम इंडियामधील खेळाडूचा धक्कादायक खुलासा!

[ad_1]

Team India :  भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. सुरूवातील भारतातील क्रिकेट टीममध्ये फिटनेसची (virat kohli Gym) जास्त क्रेज नव्हती. मात्र जेव्हा विराट कोहली जेव्हा कर्णधार झाला तेव्हापासून भारतीय संघात (team India) बदल झालेय. त्यानंतरच विराटला भारतीय संघात स्थान मिळू लागले. (jasprit bumrah lift more weight in gym then virat kohli revealed dinesh karthik)

विराट कोहली जिममध्ये गाळतोय घाम…

T20 वर्ल्डकप लक्षात घेता विराट कोहलीनं (virat kohli) त्यादृष्टीनं तयारी करण्यास सुरुवात केली आहे. कोहली नेहमीच जिममध्ये वर्कआऊट (Gym Workout) करण्यावर भर देत असतो. कोरोनामध्ये (corona update) तर विराट कोहलीनं त्याच्या घरात व्यायाम सुरू ठेवला होता. याशिवाय नेट प्रॅक्टिसच्या बाबतीही त्यानं कधीही आळस केलेला नाही. त्याच्या फिटनेसचे अनेक व्हिडिओज त्यानं ट्विटरच्या माध्यमातून शेयर केलेले आहेत.   

पण भारतीय टिममध्ये (tem india) असा एक खेळाडू आहे जो विराट कोहलीपेक्षा जिममध्ये जास्त वजन उचलतो असतो. याबाबत संघाचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने (dinesh kartik) खुलासा केला. 

हा खेळाडू विराट पेक्षा जास्त जिममध्ये…

भारतीय संघामध्ये विराट कोहलीपेक्षा (virat kohli) जिममध्ये जास्त वजन उचलणाऱ्या खेळाडूचे नाव जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना दिनेश कार्तिकने हा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की बुमराह जास्तीत जास्त 90 किलो वजन उचलतो. इंग्लंड दौऱ्यावर दुखापत झाल्याने बुमराह टीम इंडियातून धावत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेत त्याने पुनरागमन केले आहे. संघाने त्याला पहिल्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता.

वाचा : Petrol-Diesel चे दर किती वाढले? झटपट चेक करा तुमच्या शहरांतील दर     

सर्वात जास्त शॉपिंग कोण करतो…

याचदरम्यान दिनेश कार्तिकने अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या. दिनेश कार्तिकेला विचारण्यात आले आहे की, असा कोणता खेळाडू आहे जो गायक नाही पण स्वतःला सर्वात मोठा गायक समझतो. या प्रश्नाला प्रत्युत्तर करताना दिनेश कार्तिकने ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे (Ravichandran Ashwin) ​​नाव घेतले. त्याचवेळी जास्त प्रमाणात शॉपिंग (online shopping) करणाऱ्यामध्ये कार्तिकने विराट कोहलीचे नाव घेतले. विराट कोहली हा सतत काही ना काही मागत राहतो. पण दुसऱ्याच्या नाव वापरून शॉपिंग करत असल्याचा खुलासा विराट कोहलीने केला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *