Vinayak Chaturthi July 2022: विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त


Vinayak Chaturthi July 2022: प्रत्येक महिन्यात शुल्क आणि कृष्ण पक्ष असतो. या पंधरवड्यात दोन चतुर्थी येतात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी, तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी म्हणतात. आषाढ महिना सुरु झाला असून शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीची पूजा आणि उपवास करतात. आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी 3 जुलैला आहे. 

विनायक चतुर्थी 2022 मुहूर्त

  • चतुर्थी तिथी प्रारंभ- 2 जुलै, शनिवार, दुपारी 3 वाजून 16 मिनिटांनी होईल.
  • चतुर्थी तिथी समापन- 3 जुलै, रविवार, संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी होईल.
  • गणेश पूजन मुहूर्त- 11 वाजून 2 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 49 मिनिटांपर्यंत

जर तुम्ही या दिवशी उपवास करत असाल तर स्वच्छ कपडे परिधान करा आणि गणेशासमोर पूजा करताना व्रत घ्या. यानंतर शुभ मुहूर्तानुसार पूजा करावी. यासाठी गणेशाची प्रतिष्ठापना करून त्यांचा जलाभिषेक करावा. गणपतीला चंदनाचा तिलक लावावा. वस्त्र, कुंकू, धूप, दिवा, लाल फुले, पान, सुपारी इत्यादी अर्पण करा. गणेशाला सिंदूर फार आवडतो, अशी धार्मिक मान्यता आहे, त्यामुळे विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना गणेशाला लाल रंगाचा सिंदूर टिळक लावावा. सिंदूर अर्पण करताना खालील मंत्राचा जप करा.

“सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।
शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्॥ “

ज्योतिषशास्त्रानुसार गणपतीला दुर्वा अर्पण करणे आवश्यक आहे. दुर्वा गणपतीला खूप प्रिय आहे. पूजेनंतर गणेशाला मोदक अर्पण करावेत. गणेश चालिसा आणि विनायक चतुर्थी व्रत कथेचे पठण करा. या पद्धतीने पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)Source link

Leave a Reply