Headlines

माण बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे विलास देशमुख तर उपसभापती रासपच्या वैशाली विरकर

दहिवडी (आकाश दडस)- माण बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे विलास देशमुख तर वैशाली विरकर यांची निवड करण्यात आली आहे.

संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्ष पुरस्कृत शेतकरी – सहकार पॅनेलने सत्ता स्थापन केली आहे.भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने 17 पैकी 10 जागा मिळवून आपली सत्ता कायम राखली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशुमख,काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख व अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या महाविकास आघाडीला 7 जागावर समाधान मानावे लागले आहे.तर शेखर गोरे यांच्या शिवसेनेच्या पॅनेलला शून्य जागा मिळाल्या.त्यामुळे,अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *