Headlines

Vikram Gokhale: “विक्रमकाका, जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता…”; अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट!

[ad_1]

Vikram Gokhale Death: मराठी रंगभूमीचे ‘बॅरिस्टर’ अशी ओळख असलेले… मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची अचूक चुणूक दाखवणारे अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची आज प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून गोखले यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोखले यांच्या निधनानंतर (Vikram Gokhale Passes Away) विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असल्याचं पहायला मिळतंय.

फक्त मराठी नव्हे तर… हिंदी सिनेमा, तसेच मालिकांसह रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप विक्रम गोखले यांनी उमटवली. पण, आज या अभिनेत्यानं चाहत्यांमधून एक्झिट घेतली. त्यामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे. (veteran actor vikram gokhale has passed away Amol Kolhe post on twitter marathi news)

आणखी वाचा – Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

काय म्हणाले अमोल कोल्हे?

विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील! जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता कॅमेराला डबल लूक देईल, जेव्हा जेव्हा फक्त देहबोलीतून पानभर संवाद बोलला जाईल…जेव्हा जेव्हा घेतलेल्या पॉज मधूनही अचूक अर्थ पोहोचवला जाईल…जेव्हा जेव्हा एन्ट्रीच्या थाटावरून पात्राची पूर्ण पार्श्वभूमी उभी राहील, असं अमोल कोल्हे (Amol Kolhe On Vikram Gokhale) म्हणाले आहेत.

पाहा ट्विट – 

दरम्यान, एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना आणि नकळत सारे घडले या नाटकांच्या माध्यमातून विक्रम गोखले (Vikram Gokhales Drama) यांनी मराठी रसिकारांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. मराठी कलाक्षेत्रासाठी 50 वर्षे रंगभूमीची अविरत सेवा करणारे हरहुन्नरी कलावंत आज सर्वांनी गमावला हे नक्की.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *