Headlines

Vikram Gokhale : जेव्हा संतापून विक्रम गोखले म्हणाले होते; भिकार मालिका पाहणं बंद करा…!

[ad_1]

Vikram Gokhale Passes Away: जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज निधन झालंय. आज पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन (Dinanath Mangeshkar Hospital) झालं आहे. मराठी रंगभूमी, मराठी सिनेविश्वात तसेच हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्यानं नवी ओळख निर्माण करणाऱ्या विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत. काही महिन्यांपूर्वी गोखले यांनी मालिकांसंदर्भात एक वक्तव्य केलं होतं.

गोखले एकदा प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली होती. संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून  पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकांच्या माथ्यावर मारलं जातंय, असं ते म्हणाले होते.

गोखले यांनी म्हटलं होतं की, प्रेक्षकांनी स्वत:ची चॉईस तपासून पहावी, ती निश्चित करावी आणि त्याच्यावर बंधने घालावी. भिकार सिरीयल पाहणे बंद करा यावर तुमचा वेळ वाया घालवू नका. प्रेक्षक मालिका बघत नाही हे म्हटल्यावर अशा मालिता तयारच होणार नाहीत. आणि चांगल्याच्या मागे लागतील. चांगले दिग्दर्शक, नट, लेखक येतील म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, सिरीयल नक्की पाहावा.

विक्रम गोखले यांची गाजलेली नाटकं

एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना आणि नकळत सारे घडले ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत.

विक्रम गोखले यांचे गाजलेले सिनेमे

‘मॅरेथॉन जिंदगी’ , ‘आघात’ हा त्यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट, ‘आधारस्तंभ’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘कळत नकळत’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘दरोडेखोर’, ‘दुसरी गोष्ट’ , ‘दे दणादण’, ‘नटसम्राट’, ‘भिंगरी’ , ‘महानंदा’ ,’ माहेरची साडी’ आणि ‘वासुदेव बळवंत फडके’ त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत.

विक्रम गोखले यांना मिळालेले पुरस्कार

‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५), चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *