विकेंडला करतायत घरी राहायचा प्लॅन?… मग ‘या’ वेबसिरिज करतील तुमचं मनोरंजन!


WebSeries On OTT For This Weekend: घरी बसून कंटाळलाय? किंवा या विकेंडला घरीच बसून विकेंड एन्जॉय करायचाय? मग अशावेळी वेळ कसा घालवावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका. या विकेंडला तुम्ही ओटीटीवरील गाजलेल्या वेबसिरिजचा अथवा चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता. 

या विकेंडला तुम्हाला ओठीटीवर मनोरंजनाचा चांगलाच डोस मिळू शकतो कारण या विकेंडला ओटीटीवर हटके वेबसिरिज प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी काही चित्रपटगृहांमध्ये यापूर्वी प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही ते चुकवले असेल तर आता तुम्ही ते तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर आरामात पाहू शकता. OTT वर आगामी चित्रपट आणि वेब सिरीज या आठवड्यात रिलीज होत आहेत त्यांची यादी एकदा पाहाच. 

खुदा हाफिज 2: विद्युत जामवालचा नुकताच प्रदर्शित झालेला खुदा ‘हाफिज 2’ हा चित्रपट देखील या आठवड्यात OTT वर येणार आहे. हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. जर खूप दिवसांपासून अ‍ॅक्शन चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

दुरंगा : ‘दुरंगा’ ही वेबसिरीजही याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. हे झी ५ वर १९ ऑगस्टला येणार आहे, ज्यामध्ये टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी मुख्य भूमिकेत असणार आहे. ही मालिका कोरियन वेब सीरिजचा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.

शमशेरा: रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूरचा शमशेराही या आठवड्यात ओटीटीवर दार ठोठावणार आहे. आता हा चित्रपट 19 ऑगस्टला प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

हिट द फर्स्ट केस: राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा ​​स्टारर हिट – द फर्स्ट केस या आठवड्यात OTT वर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला म्हणजेच सोमवारी प्राइम व्हिडिओवर आला आहे. हा तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. Source link

Leave a Reply