Headlines

जळगावच्या विकासावरुन खडसे आणि महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशाराNCP leader Eknath Khadase criticized Girish Mahajan and Gulabrao Patil on Jalgaon development issue



जळगाव शहराच्या विकासावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “जळगावात रस्त्याच्या कामाच्या टेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. शिवाय रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. “जळगाव शहराच्या विकासाचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं होतं. विकास न झाल्यास एकही मत देऊ नका, असं महाजन म्हणाले होते”, ही आठवण करून देत खडसेंनी महाजनांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे, असं खडसे म्हणाले आहेत.

“मी एवढ्यासाठीच थांबलो होतो की…”, शिंदे गटात जाताच गजानन किर्तीकरांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

खडसेंचे कारनामे लवकरच समोर येतील, असा सूचक इशारा खडसेंच्या आरोपांनंतर गिरीश महाजन यांनी दिला आहे. “खडसेंना संपूर्ण जळगाव जिल्हा ओळखतो. त्यांना आता भरपूर वेळ आहे. म्हणून ते रोज बोलत असतात. विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम त्यांनी करत राहावं. माझं काम लोकांसमोर आहे. मात्र, त्यांनी जे केलंय ते लवकरच समोर येईल”, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

किर्तीकर पिता-पुत्रांमध्ये मतभेद? वडील शिंदे गटात, पण मुलगा अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच; गजानन किर्तीकर म्हणतात…!

दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनीही खडसेंवर निशाणा साधला आहे. “आधीच्या सरकारने ४२ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. ती आम्ही उठवली आहे. एएनओसी मिळत नसल्यानं रस्त्यांची कामं थांबली होती. मात्र, आता ही कामं सुरू झाली आहेत. खडसेंनी आजपर्यंत काही केलं नाही. त्यामुळे मी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे”, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.



Source link

Leave a Reply