तीन काळे कृषी कायदे मागे बार्शीत घेण्यात आली विजयी सभा

बार्शी / प्रतिनिधी- अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS )वतीने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सभागृह कंपाऊंडमध्ये कॉम्रेड तानाजी ठोंबरे (comred tanaji thombare )यांच्या नेतृत्वाखाली 19 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता विजयीसभा घेण्यात आली. यावेळी शहीद भगतसिंग व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडण्यात आले. यावेळी नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळेस कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, तीन काळे कृषी कायदे मागे घेण्यास शेतकरी कष्टकरी वर्गाने भाग पडले आहे हा विजय झाला नसता तर देश भांडवलशाही व्यवस्थेकडे झुकला असता, या लढ्यामध्ये शीख व मुस्लिम विरोधात गेलेला समाज एकत्र आला, बार्शी तालुका हा शहिदांचा तालुका आहे, तसाच तो कॉम्रेड अमर शेख यांचाही आहे या कायद्याविरोधात लढत असताना आम्ही बार्शी ( Barshi ) तालुक्यात पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आलो हे देखील या लढ्याचे यश आहे, या यशाला आनंद व दुःखाची झालर आहे.

शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, लढाई संपलेली नाही अन्यायाविरुद्ध लढणे ह्या विचाराने आम्ही पुढे जात राहू, 2024 मध्ये मोदींना धडा शिकवूनच शेतकरी गप्प बसेल.

मार्क्सवादी पक्षाचे कॉम्रेड एस. एस. जाधव, शिवसेनेचे दीपक आंधळकर, अंनिसचे प्रा. हेमंत शिंदे, प्रा.डॉ.अशोक कदम, राष्ट्रवादीचे ॲड.हर्षवर्धन बोलले, ॲड. सुप्रिया गुंड, ॲड.विक्रम सावळे, काँग्रेसचे वसीम पठाण, निखिल मस्के, संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, वंचितचे विवेक गजशिव, शोएब सय्यद अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड लहू आगलावे, कॉम्रेड भारत भोसले, आनंद गुरव, अशोक दळवी, किसन मुळे, उमेश पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तूद, कॉम्रेड शौकत शेख, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, बांधकाम कामगार संघटनेचे बालाजी शितोळे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन चे कॉम्रेड भारत पवार, पवन आहिरे, सुरेश शितोळे सौरभ शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply