Vijay Deverakonda- Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकलं लग्न? Photo मुळे खळबळ


Vijay – Rashmika marriage : ‘नॅशनल क्रश’ म्हटली जाणारी रश्मिका मंदान्ना ( Rashmika Mandanna) अभिनेता विजय देवरकोंडासोबत असलेल्या (Vijay Deverakonda) नात्यामुळे चर्चेत आहे. सध्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रश्मिका आणि विजय नवरा-नवरीच्या वेशात दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या, पण आता अचानक लग्नाचा फोटो चाहत्यांच्या समोर आल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. 

काय आहे फोटोमागील सत्य… 

सध्या रश्मिका आणि विजयचा व्हायरल होणारा फोटो खोटा असून त्याला इडिट केलेला आहे. ‘विजय देवरकोंडा डायहार्ड फॅन’ (Vijay Devarakonda Diehard fan) या फॅनपेज वरून दोघांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. दोघांच्या इडिट केलेल्या फोटोवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हे सध्या चर्चेचा भाग आहेत. दोघंही प्रोफेशनल लाईफमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेचा भाग ठरले आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सर्वांसमोर कबुली दिलेली नाही. (Vijay-Rashmika)

नुकताच झालेल्या एका  मुलाखतीत विजय देवरकोंडाने रश्मिकासोबत असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. देवरकोंडाने सांगितले की, तो रश्मिकाला ‘डार्लिंग’ म्हणतो. आम्ही दोघांनी सिनेमात एकत्र केलं आहेत. मला ती खूप आवडते. ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि आम्ही खासगी आणि प्रोफेशनल जीवनाबद्दल देखील आम्ही बोलतो. असं देखीस विजय म्हणाला. 

‘मी चाहत्यांना दुखवायचं नाही..’
देवरकोंडाने सांगितले की,  ज्या दिवशी माझं लग्न होईल आणि मुलं होतील, त्या दिवशी मी सर्वांना सांगेन आणि जोपर्यंत मी निर्णय घेत नाही, तोपर्यंत माझ्या नात्याबद्दल सांगणार नाही. मी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना दुखावणार नाही. (rashmika mandanna vijay deverakonda)

‘माझ्यावर प्रेम करणारे अनेक आहेत. चाहत्यांनी घरात भिंतीवर आणि मोबाईलमध्ये माझे फोटो आहेत. ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात, मला त्यांना दुखवायचं नाही. असं देखील अभिनेता म्हणाला. Source link

Leave a Reply