Video Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत? त्यांच्यासाठी सर्वच सेलिब्रिटी


मुंबई : दर्जेदार अभिनय सादर करणाऱ्या कलाकारांची नावं घ्या असं म्हटल्यास एक नाव लगेचच समोर येतं. हे नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांचं. अनेक दशकं नानांनी रुपेरी पडदा गाजवला. आजही हा अभिनेता समोर आल्यास त्याच्याप्रती मनात निव्वळ आदराचीच भावना असते. (Nana Patekar)

असा हा अभिनेता सध्या एका वेगळ्या भूमिकेत रमल्याचं दिसत आहे. नानांची ही नवी भूमिका कोणती बरं? तुम्हालाही पडलाय ना प्रश्न? 

नानांची ही नवी भूमिका कोणा एका चित्रपटासाठी नसून, मुळात ही भूमिकाच नाही तर नानांचा स्वभावच आहे. गायक राहुल देशपांडेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

हा व्हिडीओ तुम्हीही एकसारखाच पाहाल, कारण इथं नाना पाटेकर एका वेगळ्याच रुपात दिसत आहेत. समोर चुलीवर मटणाची कढई आणि नाना खुद्द आपल्याच हातांनी ताट वाढून तिथं असणाऱ्यांना आपुलकीनं जेवण वाढताना दिसत आहेत. (rahul deshpande shares a video of great actor nana patekar serving food)

‘ही जी मंडळी आहेत… ती जेवायला लागली की इतकं बरं वाटतं, म्हणजे मी एरव्ही इतक्या शिव्या देतो.. पण, एखादा दिवस असा येतो की त्यांना काहीतरी वाढता येतं’, असं नाना व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. 

नानांसाठी जणू काही सर्वणजण सेलिब्रिटी…. असाच काहीसा त्यांचा अंदाज आणि त्यांची सवय या व्हिडीओमुळं पाहता येतेय. हा कलाकार रुपी सामान्य माणूस बऱ्याच दिवसांनी तुमच्या समोर आला आहे…. त्याला या रुपात पाहुन तुम्हाला कसं वाटतंय ? Source link

Leave a Reply