Headlines

VIDEO VIRAL : विराट, हार्दिकचं चाललंय तरी काय? भर मैदानात पुन्हा बिनसलं, हद्दच झाली

[ad_1]

Virat kohli and Hardik Pandya Clash : (team india) भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अशी ओळख असणारा विराट कोहली (Virat Kohli)अनेकांसाठी आदर्श. टीम इंडियामध्ये नव्यानं येणाऱ्या खेळाडूंसाठीसुद्धा त्याच्यासोबत खेळणं म्हणजे पर्वणी. अगदी हार्दिक पांड्यापासून के.एल राहुलपर्यंतच्या (KL Rahul) सर्वच खेळाडूंमध्ये विराटसाठी विशेष प्रेम आणि आदर. पण, आता मात्र काही अशा घटना घडत आहेत जिथं विराट आणि खऱ्या अर्थानं त्याच्या प्रभावात असणारा हार्दिक पांड्या या दोघांमध्येही काहीच आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. किंबहुना याची प्रचिती देणारे बरेच प्रसंग सातत्यानं समोर येत आहेत. त्यामुळं यांचं चाललंय तरी काय? असाच प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडत आहे. 

गुवाहाटीतील सामना विराट- पांड्याच्या बाचाबाचीनं गाजला (Ind vs SL ODI)

भारतीय संघानं नुकतंच गुवाहाटीमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये श्रीलंकेचा पराभव केला. पण, हा सामना संघाच्या विजयापेक्षा जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे विराट आणि पांड्याच्या वादामुळं. 

 

भर मैदानात असं काय घडलं? (Virat kohli and Hardik Pandya)

पहिल्या प्रसंगामध्ये पांड्यानं विराटला धाव घेण्यापासून रोखलं आणि त्याचा हा निर्णय विराटला पटला नाही. त्यानं डोळ्यातूनच धाक देत पांड्याला आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी पांड्यानं काही कारणास्तव त्याच्या नजरेला नजरच दिली नाही. यानंतर सामन्यादरम्यान आणखी एका क्षणीसुद्धा त्यांच्यामध्ये असं काही घडलं की इथंही विराटचे संतप्त हावभाव सर्वांनीच पाहिले. 

सोशल मीडियावर या सौम्य बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल (Virat kohli and Hardik Pandya clash video)

विकेट गेल्यामुळं एकिकडे संघातील सर्वच खेळाडू आनंदाच्या भरात एकमेकांना टाळी देताना दिसले. त्याचवेळी पांड्यानं कळत नकळत विराटकडे दुर्लक्ष दिलं. दुसऱ्याच खेळाडूला टाळी देताना पांड्याचा हात कोहलीच्या टोपीला लागला आणि टोपीसुद्धा जागची हलली. ज्यानंतर विराटनं लगेचच टोपीकडे इशारा करत आपल्याला हे मुळीच आवडलं नसल्याचं इशाऱ्यातून बजावलं. पण, पांड्या ऐकेल तर ना. त्यानं यावेळीसुद्धा दुर्लक्षच केलं. आता पांड्यानं हे नेमकं का केलं, ते मात्र स्पष्ट झालेलं नाही. हो पण, या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय याची शक्यता मात्र आणखी गडद होताना दिसत आहे.

तसं पाहिलं, तर पांड्या आणि विराट हे दोन्ही खेळाडू त्यांच्यामध्ये असणाऱ्या मजेशीर नात्यासाठीसुद्धा ओळखले जातात. पण, सध्या मात्र नात्यानं रुप बदललं, की पांड्याला उपकर्णधारपदाची हवा लागली हे कळेना अशाच प्रतिक्रिया क्रिकेटप्रेमी देत आहेत. इतकंच काय, तर ते त्याला जमिनीवर राहा, जास्त हवेत जाऊ नकोस अशा आशयाचे सल्लेही देताना दिसत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *