VIDEO : ‘तुझी खूप आठवण येतेय’…’या’ खेळाडूला पाहून रविंद्र जडेजा भावूक


मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात काही फार चांगली झाली नाही. अखेर आरसीबी विरूद्धच्या सामन्यात चेन्नईला सूर गवसला आणि या सिझनमध्ये पहिला विजय नोंदवला. जडेजा कर्णधारचा कर्णधार म्हणून हा पहिलाच विजय होता. दरम्यान सामन्यापूर्वी जडेजा भावूक झाल्याचं दिसून आलंय.

डीवाय पाटील स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरूसोबत झालेल्या सामन्यापूर्वी  RCBचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसला पाहून जडेजा त्याचं दुःख लपवू शकला नाही. या सामन्यापूर्वी प्रॅक्टिस सेशनदरम्यान फाफ डु प्लेसिस जडेजाशी भेटला. यावेळी जडेजा भावूक झाल्याचं दिसून आलं.

दोन्ही खेळाडू एकमेकांनी भेटले तेव्हा त्यांनी मिठी मारली. फाफ गेल्या सिझनपर्यंत चेन्नईच्या ताफ्यात होता. मात्र यंदाच्या मेगा ऑक्शनपूर्वी त्याला रिलीज करण्यात आलं.

फाफ डु प्लेसिसला पाहून रविंद्र जडेजा म्हणाला, तुम्ही खूप आठवण येते. दुसरीकडे फाफ डु प्लेसिसही सीएसकेच्या खेळाडूंना भेटून खूश झाला होता. 

एकेकाळी फाफ डु प्लेसिस सीएसकेच्या टीमसाठी खेळला होता. मात्र आता तो आरसीबीचा कर्णधार आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आतापर्यंक आरसीबीने चांगला खेळ केला आहे.

कालच्या सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा पराभव केला. 23 रन्सने चेन्नईचा या सामन्यात विजय झाला. यंदाच्या सिझनमधील सीएसकेचा हा पहिला विजय होता. चेन्नईने बंगळूरूला 217 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र बंगळूरूची टीम 193 रन्सपर्यंत मजल मारू शकली.Source link

Leave a Reply