Headlines

Video : साताऱ्यात सज्जनगडावर बिबट्याचा वावर? बिबट्याचा बछडा दिसल्याने खळबळ!

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. यासंदर्भात बिबट्या पाहिल्याचे काही दावे देखील करण्यात येत होते. मात्र, त्याविषयी खात्रीशीर माहिती मिळू शकली नव्हती. आता मात्र सज्जनगडावर बिबट्याचा बछडा सापडल्यामुळे सज्जनगडावर बिबट्या असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. काही पर्यटकांना अचानक हे बिबट्याचं पिल्लू दिसल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. बिबट्याच्या बछड्याला पाहाण्यासाठी सज्जनगडावरील मंडळींनी चांगलीच गर्दी केली होती.

किल्ले सज्जनगडावर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास गडावरील रामघळ परिसरात काही युवक भटकंती करत होते. यावेळी त्यांना अचानक बिबट्याचा बछडा खेळताना दिसला. त्यामुळे युवकांची भंबेरी उडाली. काही काळ हे तरुण या बछड्यापासून चार हात लांबच राहिले. मात्र, आसपास बिबट्या नसल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी या बछड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ काढले. काही वेळातच ही घटना सज्जन गडावर समजताच युवकांची गर्दी वाढली आणि त्यातील काहींनी ही घटना तत्काळ वनधिकाऱ्यांना कळविली.

दरम्यान, एकीकडे साताऱ्यात बिबट्याचा बछडा आढळला असताना दुसरीकडे सिन्नरमधील सांगवीमध्ये थेट एका निलगिरीच्या झाडावर चढलेल्या बिबट्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपू्र्वी याच भागात नारळाच्या झाडावर झुंजणाऱ्या बिबट्यांचा थरार मोबाईल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला होता. या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *