Video : राणा डग्गुबत्तीसोबत सेल्फी काढायला गेला अन्…, अभिनेत्याचे कृत्य कॅमेरात कैद


बाहुबली (bahubali) फेम अभिनेता राणा डग्गुबत्ती (Rana Daggubati) याने नुकतेच तिरुपती बालाजी मंदिरात (tirupati balaji) दर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मिहीका बजाज आणि वडील डी सुरेश बाबू होते. यावेळी घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन राणा डग्गुबत्तीवर टीका करण्यात येत आहे.

राणा डग्गुबत्ती (Rana Daggubati) मंदिराच्या आवारात फिरत होता त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला फोटोग्राफर होते. अभिनेत्याने फोटोग्राफर्सना त्याच्या पुढे चालण्याऐवजी बाजूने चालण्यास सांगितले. दरम्यान, मध्येच एक चाहता आला आणि त्याच्यासोबत सेल्फी (selfie) काढू लागला. तेव्हा राणा डग्गुबत्ती याने त्याचा फोन हिसकावून घेतला. या घटनेचा व्हिडीओ कॅमेरात कैद (Video Viral) झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हिडिओमध्ये राणा पारंपारिक पोशाखात असल्याचे दिसत आहे. तो मंदिराच्या अधिकार्‍यांसोबत चालत असताना एक चाहता  धावत येतो आणि त्याच्यासोबत सेल्फी घेऊ लागतो. राणा डग्गुबत्ती त्याचा फोन हिसकावून घेतो आणि थोड्या वेळाने सोडून देतो. त्याच्यानंतर राणा त्याच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो, ‘मंदिरात सेल्फी घेऊ नकोस.’

दरम्यान, राणा डग्गुबत्ती शेवटचा तेलुगू रोमँटिक चित्रपट विराटपर्वममध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. काही दिवसांपूर्वीच राणाच्या आगामी ‘कब्जा’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा 1942 ते 1984 या काळातील भारतातील सर्वात मोठ्या गँगस्टर्सवर आधारित ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलाची आहे जो नंतर अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश करतो.Source link

Leave a Reply