Headlines

Video : अरे देवा… खोडकर अभिनेत्यानं मोडली काकूंची झोप; माफी मागितली आणि….

[ad_1]

मुंबई : बालपणीच्या काही आठवणी सांगताना प्रत्येकाच्यात स्मरणात अशा एक खाष्ट काकू असतात, ज्यांची आठवण नाही काढली तर बालपणात रमणंच अशक्य. खोड्या करणाऱ्यांना किंवा मग सतत खेळत असणाऱ्या मुलांना या काकूंचा भलताच धाक. अशाच काकूंशी अभिनेता शाहिद कपूर आणि त्याच्या Boys Gang ची गाठ पडली. तिसुद्धा परदेशात. 

शाहिदनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ पाहून हे लक्षात येत आहे. सध्या बॉलिवूडचा हा अभिनेता त्याच्या खास मित्रांसोबत युरोपला बाईक ट्रीपसाठी गेला आहे. इशान खट्टर, कुणाल खेमू हेसुद्धा त्याच्यासोबत गेले आहेत. 

सोशल मीडियावर शाहिद सध्या त्याच्या या ट्रीमधील काही अनुभव शेअर करताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर एक अफलातून प्रसंगही त्यानं चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. जिथं ही सॉलिड टीम कशाचीही तमा न बाळगता धमाल करताना दिसत आहे. 

इटलीतील एका रहिवासी रस्त्यावर शाहिद आणि त्याच्यासोबत असणारी ही मंडळी एका फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. आता त्यांची ही पोझही जरा विचित्रच आहे, त्यामुळं कसाबसा Balance करण्याचा प्रयत्न ही मंडळी करताना दिसत आहेत. 

हे सर्व करत असताना तिथंच गल्लीशी असणाऱ्या एका घरातून काकू काहीशा डोकावतात. व्हिडीओ पाहता तरी शाहिद आणि त्याच्या पंटर लोकांनी काकूंची झोप मोड केली, असंच दिसत आहे. 

आता आपल्याकडून चुक झालीये… ती सुधारायलाच हवी यासाठी मग शाहिदनं ‘Sorry Aunty’ असंही आपल्या व्हिडीओमध्ये लिहिलं. परदेशातच जाऊन कल्ला करणाऱ्या शाहिदचा हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला? 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *