VIDEO: ‘डब्बे पाठवा, नाहीतर…’ Farah Khan सेलिब्रिटींवर भडकली


Farah Khan : बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक असे कलाकार (Artist) आहे ते त्यांचा कामाशिवाय त्यातील वेगळ्या गुणांनीही ओळखले जाता. त्यातील एक नाव आहे फराह खान. तिच्या मजेदार शैलीसाठी (Funny style) ती बॉलिवूडसह सोशल मीडियावरही (Social media) प्रसिद्ध आहे. तिच्यातील अजून एक गुण म्हणजे ती उत्तम स्वयंपाक करते. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तिच्या हातचं जेवायला तिच्या घरी जातात. एवढंच नाही तर ते कलाकार जेवण्यानंतरही घरी जाताना या स्वादिष्ट पदार्थ डब्ब्यात भरून घेऊन जातात. 

 फराह खान सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओ ती सेलिब्रिटींवर भडकलेली दिसतंय. ती या व्हिडीओमध्ये सांगते की, जे अनेकदा तिच्या घरून टिफिन (Tiffin) घेऊन जातात. जेवण खातात, पण टिफिन परत करत नाहीत. अशा परिस्थितीत फराहने सोशल मीडियावर तिचा त्रास शेअर केला आणि सर्वांना एकत्र तिचा टिफिन परत करण्यास सांगितलं. हा व्हिडीओ (Video) शेअर करत तिने टिफीन परत करण्याची मागणी केली आहे.  (farah khan asks flared up to celebs and says return those dabba viral Video on Social media NM)

 बाई ती बाईच शेवटी…एक महिला तिच्या घरातील डब्ब्यांवर खूप प्रेम करत असते. फराह खानलाही तिच्या टिफिन खूप प्रिय असंच या व्हिडीओ वरुन दिसून येतं. फराह खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (viral) होतो आहे. नेमकं फराह खान काय म्हणाली पाहा हा व्हिडीओ….

फराहच्या या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. भावना पांडे (Bhavana Pandey) लिहितात, ‘मी तुमचे टिफीन परत केले आहेत.’ सीमा सजदेहने (Seema Sajdeh) लिहिले की, ‘बास्टर्ड, मी नेहमी डब्बे भरून तुला परत पाठवते.’ 

याशिवाय डायना पेंटी (Diana Penty), संजय कपूर (Sanjay Kapoor), रवीना टंडन (Raveena Tandon), गीता कपूर (Geeta Kapoor), राहुल वैद्य (RAHUL VAIDYA), सिमी गरेवाल (Simi Garewal), व्हीजे अनुषा (VJ Anusha) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी फराह खानच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. Source link

Leave a Reply