Headlines

Video: भाजपाकडे जास्त आमदार असूनही मुख्यमंत्रीपद शिंदे गटाला का दिलं? मुख्यमंत्री शिंदे कारण सांगताना म्हणाले, “मोदींनी…” | Eknath Shinde On Why PM Modi Offered CM Post to Shivsena Rebel Group even though BJP has more MLAs scsg 91

[ad_1]

महाविकास आघाडी सरकार कोसळळ्यानंतर राज्यामध्ये नव्याने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनीच एक मोठा खुलासा केलाय. केवळ ५० आमदारांचं समर्थन असूनही आपल्याला मुख्यमंत्री पद भाजपाने का दिलं यासंदर्भात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत भाष्य केलं. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यामधील भाषणादरम्यान शिंदे यांनी कमी आमदार असूनही मोदींनी आम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला असं म्हटलंय. तसेच यामागील कारण काय होतं तेही भाषणात सांगितलं.

नक्की पाहा >> Video: “…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता”; गळ्यावरुन हात फिरवत जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेकांना फडणवीसच पुन्हा येतील असं वाटत असतानाच त्यांनीच ३० तारखेच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचं नाव निश्चित करण्यात आल्याचं जाहीर केलं. तसेच फडणवीस यांनी आपण सरकारमधून बाहेर राहणार असल्याचं दुपारच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर सायंकाळी अन्य एका नाट्यमय घडामोडीनंतर फडणवीस यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद देण्यावरुनही बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. भाजपाकडे १०६ आमदार असूनही त्यांनी मुख्यमंत्रीपद बंडखोर गटाला दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या ‘वडील चोरायला निघाले’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “त्यांच्या आशीर्वादामुळेच हे…”

मुख्यमंत्रीपदासंदर्भात बोलताना आपण मुख्यमंत्री होऊ असा विश्वास मलाही वाटत नव्हता असंही म्हटलं. “मलाही विश्वास नव्हता की मी राज्याच्या मुख्यमंत्री होईल. मात्र सर्व काही घडत गेलं. तुम्ही सारं टीव्हीमध्ये पाहिलं असेल,” असं शिंदे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर पुढे शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला. “मला सांगायला अभिमान वाटतोय जनतेच्या आशीर्वादाने आम्ही जी बाळासाहेबांच्या विचारांची लढाई लढो ती जिंकलो,” असं शिंदे म्हणाले. पुढे शिंदे यांनी, “हे शिवसेना-भाजपा युतीचं राज्य आहे,” असंही नमूद केलं. शिंदे यांनी राज्यातील या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा पाठिंबा असल्याचं सांगतानाच ते बंडखोर आमदारांबद्दल काय म्हणाले यासंदर्भातही भाषणामध्ये माहिती दिली.

नक्की वाचा >> ‘दिल्लीच्या आदेशानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले तर फडणवीस उपमुख्यमंत्री’ यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “त्यांनी दगड…”

“आम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील खूप मोठा पाठिंबा दिला. त्यांच्याकडे तर आमच्यापेक्षा जास्त आमदार होते. पण त्यांनी (मोदींनी) सांगितलं, ‘हे लढवय्ये लोक आहेत. हे बाळासाहेबांचे एकदम कट्टर शिवसैनिक आहेत. यांच्या पाठीशी उभं रहायला पाहिजे.’ मग त्यांनी (मोदींनी) मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला,” असं शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> ‘खंजीर खुपसला’ टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये…”

शिंदे यांनी भाषणात, “आता आपल्याला काम करायचं आहे. हे सर्वसामान्यांचं असून त्यांना न्याय देणारं सरकार आहे. हे मेंढपाळाचं, पानटपरीवाल्याचं, भाजीवाल्याचं, कामगाराचं सरकार आहे. श्रम करुन मेहनत करणाऱ्या, प्रामाणिकपणे जगणाऱ्या माणसाचं हे सरकार आहे,” असंही म्हटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *