Video: बॅकग्राऊंड डान्सर ते जज, रेमो डिसूजाचा थक्क करणारा प्रवास


मुंबई : रेमो डिसूझा आज प्रत्येक जण ओळखतो. पण आज एक यशस्वी कोरिओग्राफर होण्यासाठी त्याला आधी खूप संघर्ष करावा लागला होता. आज बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींना त्यांना डान्स शिकवला आहे. बॉलीवूड चित्रपटांतील अनेक अविस्मरणीय गाणे रेमोने कोरिओग्राफ केले आहे. सध्या तो ‘डीआयडी सुपर मॉम्स 3’ ला जज करत आहे. यावेळी उर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री त्याच्यासोबत रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसत आहेत. (remo dsouza share memory with urmila matondkar)

उर्मिला मातोंडकरच्या मागे डान्स करणारा रेमो आज तिच्या सोबत जज आहे. अभिनेत्रीसोबत तो स्टेज शेअर करतोय ही रेमो डिसूझासाठी गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ‘रंगीला’ चित्रपटातील ‘याई रे येई रे’ गाण्याची एक छोटी क्लिपिंग रेमोने शेअर केली आहे.

व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये रेमोने लिहिले की, ‘मी कधीही यशाचे स्वप्न पाहिले नव्हते, मी ते मिळवण्यासाठी काम केले. उर्मिला मातोंडकर मॅडम, तुमच्यासोबत स्टेज शेअर करणे हा माझा बहुमान आहे.’

हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. व्हिडिओची सुरुवात ‘याई रे येई रे’ गाण्याच्या क्लिपिंगने होते, ज्यामध्ये रेमो डिसूझा उर्मिला मातोंडकरच्या मागे बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसत आहे. यानंतर, व्हिडिओमध्ये ‘डीआयडी सुपर मॉम्स 3’ शोची क्लिपिंग आहे, ज्यामध्ये उर्मिला आणि रेमो स्टेजवर ‘याई रे याई रे’ वर नाचताना दिसत आहेत.

रेमो डिसूझा बॅकग्राउंड डान्सरपासून प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर आणि सुपर जज बनला आहे. लोक त्याच्या पोस्टवर कमेंट करून आणि त्याच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्याचे कौतुक करत आहेत. म्हणूनच आज त्याचे लाखो चाहते आहेत.

‘डीआयडी सुपर मॉम्स 3’ रेमो डिसूझा, भाग्यश्री दासानी आणि उर्मिला मातोंडकर जज करत आहेत. Source link

Leave a Reply