Video: इशान किशाननं तशीच कृती करून लॅथम आणि तिसऱ्या पंचांना डिवचलं! पाहा नेमकं काय झाले ते

[ad_1]

India vs New Zealand One Day 1st Match: तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने आपल्या खिशात घालत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 349 धावा केल्या आणि विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या सामन्यात हार्दिक पांड्याची विकेट वादाच्या भोवऱ्यात अडकली. कारण हार्दिक पांड्याला त्रिफळाचीत घोषित केल्यानं क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र तसाच काहीसा प्रकार न्यूझीलंडच्या इनिंगवेळी घडला. 40 षटकातील चौथ्या चेंडू डेरिल मिशेलनं हार्दिक पांड्याला टाकला. मात्र या चेंडूवर बेल्स चमकल्याने अपील करण्यात आलं. मैदानातील पंचांना नेमकं काय झालं ते कळलं नसल्याने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तेव्हा तिसऱ्या पंचाने हार्दिक पांड्याला बाद दिलं. मात्र यावरून चांगलाच वाद रंगला. नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्या आऊट नसल्याचं सांगत पंचांना धारेवर धरलं. दुसरीकडे इशान किशाननं तशीच कृती करून फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा विकेटकीपर कर्णधार टॉम लॅथम आणि तिसऱ्या पंचांना डिवचलं अशी चर्चा रंगली आहे.

नेमकं काय झालं?

कर्णधार रोहित शर्मानं संघाचं 16 षटक कुलदीप यादवला सोपवलं. पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हेन्री निकोल्सनं चौकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर त्रिफळा उडवत हेन्री तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीप यादवनं टाकलेल्या चौथ्या चेंडूवर मात्र वेगळंच चित्र मैदानात पाहायला मिळालं. विकेटकीपर फलंदाज टॉम लॅथमनं चेंडू तटावला. मात्र बेल्स चमकल्याने मैदानात संभ्रमाचं वातावरण झालं. मैदानातील पंचांना देखील कळलं नाही. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं अपील केलं. त्यानंतर हीट विकेट्स निर्णयासाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली पण इशान किशननं घेतलेली फिरकी लक्षात आली आणि नाबाद घोषित करण्यात आलं. 

बातमी वाचा- ‘200 धावा केल्यानंतर तीन मॅच खेळला नाही’, रोहित शर्मानं प्रश्न विचारताच इशान किशननं दिलं असं उत्तर

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वाशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

न्यूझीलंड- फिन एलेन, डेवॉन कॉनव्हे, हेन्री निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलीप्स, मिशेल ब्रासवेल, मिशेल सँटनर, हेन्री शिप्ले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *