कधीच पाहिलं नसेल ऐश्वर्याचं हे रुप; लेकिनं फोटोसाठी पोझ देताच काय केलं? पाहा Video


मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही कान्स फिल्म फेस्टीव्हलसाठी रवाना झाली. यावेळी लेक आराध्या आणि पती अभिषेक बच्चन ही मंडळीसुद्धा तिच्यासोबत परदेशात रवाना झाली. यावेळी विमानतळावर ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबाची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांनी प्रचंड गर्दी केली. (Aishwarya Rai Bachchan leaves for Cannes film festival 2022)

गर्दीतही ऐश्वर्या तिच्या लेकीला हाताशी धरून दिसली. पण, तिथे असणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी पाहता या ज्युनियर बच्चन कुटुंबीयांनी फोटोसाठी पोझ दिली. 

ऐश्वर्याप्रमाणंच आराध्याही आता माध्यमांपुढे अगदी सहजपणे वावरते. यावेळीही तेच झालं. आराध्यानंही तिच्या आईप्रमाणं म्हणजेच ऐश्वर्याप्रमाणं फोटोसाठी पोझ देण्यास सुरुवात केली. 

मुलीचं हे वागणं पाहून ऐश्वर्यालाही तिचं कौतुक वाटलं. सध्या याच क्षणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. जिथं अॅशचं कधीही न पाहिलेलं रुप सर्वांसमोर आलं आहे.

कान्सला रवाना होतेवेळी ऐश्वर्यानं पूर्ण काळ्या रंगाच्या आऊटफिटला पसंती दिली होती. तर आराध्याचं आऊटफिट गुलाबी रंगाचं होतं. अभिषेकनं जीन्स आणि जांभळ्या रंगाच्या स्वेटशर्टला पसंती दिली होती. (Abhishek bachchans)

बच्चन कुटुंबानं यावेळी तिथं असणाऱ्या सर्वांचीच मनं जिंकली. दरम्यान, कान्ससाठी जाण्याची आराध्याची ही पहिलीच वेळ नाही. 

याआधीही आराध्या ऐश्वर्यासोबत कान्ससाठी गेली होती. अर्थात तेव्हा ती बरीच लहान होती. पण, यावेळी मात्र तिला बऱ्याच गोष्टी समजत असल्यामुळं यंदाचा कान्स महोत्सव या माय-लेकिंसाठीही खास असणार यात शंका नाही. Source link

Leave a Reply