Pathaan चित्रपट पाहिला मिळाला नाही तर… शाहरुख खानच्या चाहत्याने दिली धमकी, पाहा Video


Pathaan : बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग (Pathaan Advance Booking) फूल झालं असून काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित झालेल्या टिझरने (Teaser) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर चित्रपटाला बॉयकॉट (#Boycott) करण्याचं ट्रेंड आला. पण याचा कोणताही परिणाम चित्रपटावर दिसत नाहीए. 

तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. त्यामुळे यावेळी तो धमाका करणार याकडे चित्रपटप्रेमींबरोबरच चित्रपट समीक्षकांचंही लक्ष लागलं आहे. चित्रपट प्रेमींमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येतेय. अशातच एका चाहत्याने चक्क चित्रपट पाहिला मिळाला नाही तर आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. 

शाहरुखच्या चाहत्याने दिली धमकी
सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत एक मुलगा रडताना दिसत आहे. त्याच्याकडे शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचं तिकिट खरेदी करण्यासाठी पैसे नाहीएत. आपल्याला कुणीतरी तिकिटासाठी पैसे देण्याची विनंती करताना तो या व्हिडिओत दिसतोय. इतकंच नाही तर चित्रपट पाहिला नाही तर नदीत उडी मारुन आत्महत्या करेन अशी धमकीही तो देतोय. 

व्हिडिओ काय आहे?
व्हिडिओत तो मुलगा म्हणतोय, ‘मी पठाण चित्रपट पाहू शकणार नाही, मी शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे. मी शाहरुख खानवर प्रेम करतो. पण माझ्याकजे पैसे नसल्याने मी पठाण चित्रपट पाहू शकणार नाही. माझी कोणीही मदत करत नाहीए. कृपया मला कुणीतरी पठाण चित्रपटाचं तिकिट मिळवून द्या, नाहीत मी नदीत उडी मारून आत्महत्या करेन’ असं तो मुलगा म्हणताना दिसत आहे.

लोकांनी केलं ट्रोल
सोशल मीडियावर तरुणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर लोकांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. काही त्या मुलाची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. तर काहींनी त्याचा पेटीएम नंबरही मागितला आहे. पण केवळ चित्रपट पाहता आला नाही म्हणून आत्महत्येसारखं पाऊल उचलणं म्हणजे मुर्खपणा असल्याचं काहींनी सांगितलं. जिवंत राहिलास तर असे अनेक चित्रपट पाहता येतील, आपल्या आवड्या अभिनेत्याकडून काही शिक असा सल्लाही काही जणांनी दिलाय. तर मेहनत कर आणि स्वत:च्या कमाईवर चित्रपटाचं तिकिट खरेदी कर असंही त्याला सुनावलं आहे. 

कधी प्रदर्शित होणार ‘पठाण’
शाहरुख खान, दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांची प्रमुख भूमिका असेला ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंगही फूल झालं आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याने वाद निर्माण झाला होता. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत हिंदू महासभेने आणि अनेक राजकीय नेत्यांनी या चित्रपटाविरोधात आवाज उठवला. मात्र त्याचा उलट फायदा या चित्रपटांच्या गाण्यांना होताना दिसला. चित्रपटातील दोन्ही गाण्यांना कोट्यवधी व्हिव्यू मिळाले आहेत. Source link

Leave a Reply