Headlines

विक्की कौशलचे कतरिना नव्हे तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत प्रायव्हेट फोटो व्हायरल

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ आजकाल आयुष्याच्या अद्भुत टप्प्याचा आनंद घेत आहेत. पण आता विकी कौशलचे असे काही फोटो समोर आले आहेत. जे पाहून कतरिना कैफला जरा धक्का बसू शकतो. या फोटोंमध्ये विकी कौशल दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

लग्नानंतर अचानक विकी कौशलचे असे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत आणि कतरिनाच्या प्रतिक्रियेची चर्चा होत आहे.  आज आम्ही तुम्हाला व्हायरल होत असलेल्या विकीच्या या रोमँटिक फोटोंचं रहस्य सांगणार आहोत.

खरं तर, विकी कौशल आणि तृप्ती डिमरी आनंद तिवारीच्या पुढच्या दिग्दर्शनात एकत्र दिसणार आहेत. ज्याची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र चित्रपटाचं शूटिंग जोरात सुरू आहे.

टीम सध्या क्रोएशियामध्ये आहे आणि अलीकडेच विकी आणि तृप्तीने रोमँटिक ट्रॅकसाठी शूटिंग केलं. सेटवरील हे फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत आणि चाहते आधीच या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

लग्नानंतर विकीचे असे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचं म्हणणं आहे की, अभिनेत्याचे हे फोटो पाहून कतरिनाला थोडा राग येणं स्वाभाविक आहे.

समोर आलेल्या फोटोमध्ये, आपण पाहू शकता की विकी कौशल पांढरा पोशाख परिधान केलेला दिसत होता आणि तृप्तीने रफल्ड लाँग स्कर्टसह पिवळा क्रॉप टॉप घातला होता. दोघांची केमिस्ट्री नक्कीच या प्रोजेक्टसाठी सगळ्यांना उत्सुक करणारी आहे.

तर, फराह देखील क्रोएशियामध्ये आहे आणि ती आनंद आणि विकीसोबतचे फोटो शेअर करत आहे, त्यामुळे फराह हे गाणे कोरिओग्राफ करत असल्याचं समजतं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *