Headlines

दिग्गज खेळाडूनं घेतला सन्यास, ‘हे’ आहे कारण

[ad_1]

मुंबई : देशभरात सध्या कॉमनवेल्थची हवा सुरु आहे. देशाचे अनेक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत पदक पटकावीत आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत पदकाची लयलुट सुरु असताना आता एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. यशाचा उत्तुंग शिखरावर असताना या खेळाडूने अचानक निवृ्त्ती घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकीकडे अनेक खेळाडू पदकांची लयलूट करत असताना अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्स (serena williams) हिने निवृत्तीची घोषणा केली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत तिने याबाबतची घोषणा केली आहे.  

पोस्टमध्ये काय? 
जगभरात टेनिसच्या माध्यमातून आपला ठसा उमटवणारी 40 वर्षीय टेनिसपटू सेरेना विल्यम्स (serena williams retirement) हिने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहले की, आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करत असतो तेव्हा ते नेहमीच कठीण जाते.  मी टेनिसचा आनंद घेत होते. मात्र आता उलटी गिनती सुरू झाली आहे, असे ती पोस्टमध्ये म्हणतेय. 

पुढे ती म्हणाली, मला एक आई होण्यासोबत, माझ्या अध्यात्मिक ध्येयांवर आणि सेरेनाला वेगळी पण तितकीच रोमांचक शोधण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे असे ती म्हणते आहे.  

सेरेना विल्यम्सने (serena williams) यूएस ओपनमध्ये चमकदार कामगिरी करताना आपल्या कारकिर्दीत एकूण 6 वेळा हे विजेतेपद पटकावले. त्याने 1999, 2002, 2008, 2012, 2013 आणि 2014 मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले. त्याच वेळी, ती 23 वेळा ग्रँडस्लॅम विजेती देखील आहे. 

गेल्या काही काळापासून ती दुखापतींनी त्रस्त होती. टेनिस कोर्टवरील तिला तिचा फॉर्मही साथ देत नव्हता. खराब फॉर्ममुळे तिच्या निवृत्तीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. अखेर तिने आज राजीनाम्याची घोषणा केली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *