Headlines

“वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला का गेला? कोणी पैसे मागितले का?” राज ठाकरेंनी केली चौकशीची मागणी | raj thackeray comment on vedanta foxconn project said maharashtra government is not serious about industry sector

[ad_1]

वेदान्त-फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्रातून गुजरातला प्रकल्प जाणे, हे राज्य सरकारचे अपयश आहे, म्हणत विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर याआधीच्या महाविकास आघाडी सरकारमुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला, असा दावा सत्ताधारी शिंदे गट- भाजपाकडून केला जातोय. याच मुद्द्यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्योग क्षेत्राकडे महाराष्ट्राचे लक्ष नाहीये. हा प्रकल्प गुजरातला का गेला? या उद्योजकांना कोणी पैसे मागितले होते का? असे प्रश्न उपस्थित करत याबाबतची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> राज ठाकरेंचा मोठा निर्णय! मनसेची नागपूर कार्यकारिणी बरखास्त; नव्या तरुणांना दिली जाणार संधी

औद्योगिक क्षेत्राकडे महाराष्ट्राचे लक्ष नाहीये. नेमकं कोठे बिघडलं याची चौकशी होणे गरजेचे आहे. या उद्योजकांकडे पैसे मागितले गेले का? प्रत्येक राज्यात उद्योगधंदे यायलाच पाहिजेत. पण महाराष्ट्रात आलेले उद्योग राज्याबाहेर का जात आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

हेही वाचा >>> अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद कबूल केलं होतं? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…

१९९९ ते २००४ या काळात बीएमडब्ल्यूचा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता. तेव्हा विलासराव देशमुख यांचे सरकार होते. बीएमडब्ल्यूची सर्व लोक महाराष्ट्रात आली होती. त्यांची मंत्रालयात बैठक होती. मात्र महत्त्वाचे काम आल्यामुळे विलासराव देशमुख त्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी अधिकाऱ्यांना त्या बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले होते. यातील काही अधिकारी दाक्षिणात्य होते. जेव्हा उद्योग येतो तेव्हा पायाभूत सुविधा लागतात. त्याविषयीच या बैठकीत बोलणे सुरू होते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी अडचणींचा पाढा सुरू केला. त्यामुळे आम्ही निघतो असे बीएमडब्ल्यूचे अधिकारी म्हणाले. नंतर महाराष्ट्रात येणारा बीएमडब्ल्यूचा कारखाना तामिळनाडूमध्ये गेला, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.

हेही वाचा >>> २०२४ च्या निवडणुकीत मोदींविरोधात कोणता चेहरा? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले “काँग्रेसला सोबत घेऊ नये…”

येणाऱ्या उद्योगांवर आपलं लक्ष नसेल तर आपल्याकडे कोण आणि का येईल? उद्योगातून रोजगार निर्मिती किती होतेय, हे पाहणे गरजेचे आहे. आपण महाराष्ट्रातून उद्योग घालवतोय यापेक्षा दुसरं दुर्दैवी काहीही नाही. गुजरातकडून चांगली सुविधा दिली जात असेल, तर फॉक्सकॉनचा कारखाना तिकडे का जाणार नाही? असा सवालही त्यांनी केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *