Headlines

वावा सुरेशच्या प्रकृतीबाबात मोठी अपडेट, पाहा सध्याची परिस्थिती

[ad_1]

मुंबई : कोब्रा चावल्यानंतर आठवडाभरानंतर, लोकप्रिय साप पकडणारा बी. सुरेश उर्फ ​​वावा सुरेशला सोमवारी कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून (MCH)डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्याव वावा सुरेशचे जनतेने जोरदार स्वागत केले. त्यानंतर मीडियाशी बोलताना वावा सुरेशने मंत्री व्ही. एन. वसावान यांचे मनापासून आभार मानले. खरेतर साप चावल्यानंतर वावा सुरेशची प्रकृती फारच खालावली होती यामुळे त्याला काही दिवस आयसीयुमध्ये ठेवले होते. 

वावा सुरेशसाठी संपूर्ण शहर प्रर्थना करत होते. ज्यामुळे काही दिवसांनी ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याला सोमवारी डिस्चार्ज देण्यात आले. आता त्याची प्रकृती सुधारली आहे.

मीडियाशी बोलताना सुरेश म्हणाला “वेळीच मला योग्य ते उपचार मिळाल्यामुळे माझे प्राण वाचले आहे. एखाद्या मंत्र्यानी त्याच्या गाडीमधून सामान्य माणसाला लिफ्ट देण्याची किंवा गाडीतून आणण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.” पुढे आनंदी होऊन सुरेश त्यांनी MCH कर्मचार्‍यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभारही मानले.

वावा सुरेशने साप पकडण्यासाठी वैज्ञानिक उपकरणे न वापरल्याबद्दल त्यांच्यावर होत असलेल्या टीकेचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आणि वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने त्यांच्याविरूद्ध चुकीची माहिती मोहीम चालवली असल्याचा आरोप केला. त्यावेळी वावा सुरेश यांनी आतापासून आपण साप पकडण्यात अधिक काळजी घेऊ असे सांगितले आणि पुढे हे ही म्हणाले की मी मरेपर्यंत हा व्यवसाय सुरू ठेवणार आहे.

कुरिची येथे मानवी वस्तीतून सापाची सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना 31 जानेवारी रोजी वावा सुरेश याला नागाने चावा घेतला होता. 10 फूट लांबीच्या सरपटणाऱ्या प्राण्याला गोणीत टाकत असताना सापाने त्याच्या उजव्या मांडीवर चावा घेतला. हा घटना फक्त 10 सेकंदात घडली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडीयावरती व्हायरल झाला आहे. खरोखरच अंगावरती काटा आणणारा हा प्रसंग होता.

या घटनेनंतर वावा सुरेशला तात्काळ रुग्णालयात नेत असताना श्री सुरेश बेशुद्ध झाले आणि त्यांना एमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने न्यूरो आणि कार्डियाक तज्ज्ञांची मदत घेतली.

उपचारादरम्यान, वाव सुरेशला एन्टी डोसच्या 25 ते 30 सामान्य डोसच्या तुलनेत अँटी व्हेनमच्या 65 डोस देण्यात आले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *