Vastu Tips : श्रावण महिन्यात घरात लावा शंकराचा ‘असा’ फोटो; नाही भासणार आर्थिक चणचण


Vastu Tips : श्रावण महिन्याची सुरुवात होताच अनेकजणांचे उपवास सुरु होतात. श्रावणी सोमवारचे उपवास हे त्यापैकीच एक. श्रावणामध्ये देवांचेही देव मानल्या जाणाऱ्या शंकराची पूजा- अर्चा केली जाते. वास्तू शास्त्रामध्येही शंकराच्या भक्तीच्या आणि आराधनेच्या पद्धती आणि त्यांच्या फायद्यांचे उल्लेख करण्यात आले आहेत. (Vastu Tips shravan month lord shankar statue photo )

योग्य पद्धतीनं शंकराची पूजा केल्यास त्यामुळं घरात सकारात्मक उर्जा, धनधान्य संपत्ती आणि सुख- शांतीचा वावर अनुभवता येतो. यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं. 

– तुम्ही घरात जर शंकराती मूर्ती किंवा फोटो ठेवू इच्छिता, तर ती अशा ठिकाणी लावा जिथून सर्वांच्या नजरेस पडू शकेल. असं केल्यास घरात सकारात्मक उर्जा संचारेल. 

– एक गोष्ट लक्षात घ्या, की कधीच शंकराची रौद्र रुप असणारी मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका. अशानं घरात नकारात्मक उर्जा वाढीस लागते. 

– शंकर आणि पार्वतीची मूर्ती लावणंघी शुभसूचक मानलं जातं. वास्तूच्या नियमांमध्ये नमूद केल्यानुसार असं केल्यास देवी लक्ष्मीही प्रसन्न होते. 

– जर एखाद्या घरात सातत्यानं कलह निर्माण होत असेल, तर अशा वेळी शंकर- पार्वती यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अर्थात कार्तिकेय आणि गणपतीसह असणारा फोटो लावल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. 

– ज्या ठिकाणी शंकराचा फोटो किंवा मूर्ती ठेवली जाईल त्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जाणं अतीव महत्त्वाचं. 

– घरात उत्तर दिशेला शंकराची मूर्ती लावा. वास्तुनियमांनुसार असं केल्यास व्यक्तीवर असणारी संकटं दूर पळतात. घरात सुखशांती नांदते. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भावर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)Source link

Leave a Reply