Headlines

Vastu tips: ‘या’ दिशेला तोंड करून जेवल्यामुळे होणार असंख्य फायदे; पूर्ण होणार सर्व इच्छा

[ad_1]

मुंबई : शारीरिक सुदृढता जपण्यासाठी कायमच पोषक आहार करणंही महत्त्वाचं असतं. पण, तुम्हाला माहितीये का आहारामध्ये पोषक घटकांची काळजी घेण्यासोबतच ते योग्य त्या ठिकाणी बसून ग्रहण केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं. जेवण तयार करण्यापासून ते ग्रहण करण्यापर्यंतची जागा अयोग्य असल्याच जीवनात काही अडथळे निर्माण होतात ही बाब लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं. (Vastu health tips best direction to eat food read details )

जेवणासाठी कोणती दिशा योग्य ? 
– वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार जेवण्यासाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे पूर्व. या दिशेला तोंड करून अन्न ग्रहण केल्यास आरोग्याच्या सर्व चिंता मिटतील. आयुर्मान वाढेल आणि जीवात सुख- समृद्धी नांदेल. 

– ज्यांना कमी वेळातच आर्थिक लाभ मिळवायचा असेल त्यांनी कायम उत्तर दिशेला तोंड करून जेवणं उत्तम. ही धनदेवता कुबेराची दिशा, त्यामुळं याचा फायदा होण्यासोबतच तुम्ही बलवानही व्हाल. घरातील मुख्य पुरुषानं कायमच या दिशेला तोंड करुन जेवण घ्यावं. 

– नोकरी किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी इंटर्व्यू , परीक्षा देऊन आल्यास मनाजोग्या निकालासाठीसुद्धा उत्तरेकडे तोंड करून जेवणं फायद्याचं. 

– पश्चिम दिशेला तोंड करुन जेवल्यास आजारपण दूर होतं. आरोग्य सुधारतं. 

– सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दक्षिण दिशेची. कारण या दिशेला तोंड करुन जेवल्यास आजारपणांचा आघात होतो, घरात दारिद्र्य येतं. आर्थिक नुकसानही होतं. 

तुम्हीही अयोग्य दिशेला तोंड करून जेवत असाल तर, आताच ही चूक सुधरा कारण; फायदा तुमचाच… 
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे देण्यात आली आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. )



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *