आयटक शिक्षकेतर संघटनेने विद्यापीठाकडे केेल्या विविध मागण्या

बार्शी / प्रतिनिधी – आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या मा. डॉ. मृणालिनी फडणीस यांना महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवेदन देण्यात आले. मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनामध्ये देण्यात आला आहे.

विद्यापीठाने शासन नियमाप्रमाणे व प्राध्यापकांना दिल्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 15 किरकोळ नैमित्तिक रजा द्याव्यात, पीएच.डी. पात्र धारक शिक्षकेतरांना इतर विद्यापीठांमध्ये प्रोत्साहन भत्ता दिला जातो तसा प्रोत्साहन भत्ता द्यावा, प्रत्यक्षिक परीक्षा मोबदला वाढवून मिळावा, विद्यापीठांमध्ये कामानिमित्ताने येणाऱ्या महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी योग्य ठिकाणी स्टाफ रूम द्यावी, अर्हता प्राप्त शिक्षकेतरांना गुणवत्तेप्रमाणे शिक्षक म्हणून सामावून घ्यावे या मागण्या निवेदनात मध्ये करण्यात आल्या आहेत.

कोवीड 19 नियमांचे पालन करून मा. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना निवेदन दिले असता त्यांनी मागण्या वर सकारात्मक विचार करून पूर्तता केली जाईल असे तोंडी आश्वासन दिले.

निवेदन गणेश करंजकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सचिव कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद हे उपस्थित होते. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, उमेश मदने, विलास कोठावळे, आरती देशकर – रावळे, सुधीर सेवकर, काशिनाथ डूरे यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply