Headlines

वाढत्या वीज बिलाचे टेन्शन विसरा, या स्मार्ट टिप्सच्या मदतीने Electricity Bill येणार कमी, होणार सेव्हिंग

[ad_1]

नवी दिल्ली : Electricity Bill Tricks: आजकाल AC, Coolers, आणि Home Appliances सह Electronic Devices चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जवळ-जवळ प्रत्येक घरात आता ही डिव्हाईस दिसून येतात. एसी आणि कुलर जास्त चालत असल्याने वीज बिलात देखील वाढ होते. डिव्हाइसेसचा सतत तासन तास वापर करत असतांना अनेक जण यामुळे बिल जास्त येऊ शकते याकडे दुर्लक्ष करतात. पण, नंतर बिलाची भली मोठी रक्कम पाहून टेन्शन येते. तुम्हालाही अशाच समस्या येत असतील तर आता काळजीचे कारण नाही. काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही Electricity Bill कमी करू शकता. पाहा टिप्स.

वाचा: Smartphone Buying Tips : नवीन स्मार्टफोन खरेदी करतांना ‘या’ गोष्टी ठेवा डोक्यात, नुकसान होणार नाही

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे रेटिंग नक्की तपासा :

देशात स्मार्ट Electronic Products चा कल झपाट्याने वाढत आहे. आजकाल कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याचे रेटिंग तपासणे आवश्यक झाले आहे. रेटिंगमुळे तुमचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन किती कमी वीज वापरते याची नीट कल्पना येते. सहसा ५ स्टार रेटिंग असलेल्या उत्पादनांद्वारे सर्वात कमी वीज वापर केला जातो. म्हणूनच जास्तीत जास्त रेटिंगसह उत्पादने खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

वाचा: Nothing Phone 1 ला मार्केट कॅच करणं अवघड, मार्केटमध्ये हे स्मार्टफोन्स देताहेत ‘टक्कर

AC वापरताना तापमान सेट करा :

जर तुम्हाला तुमच्या घराचे वीज बिल कमी करायचे असेल तर, एसी २४ डिग्री तापमानावॉर वापरणे कधीही चांगले.

दिवसा लाईट्स बंद ठेवा :

अनेकांना घरी प्रकाश असतांना देखील लाईट्स सुरू ठेवण्याची सवय असते. जर दिवसा तुमच्या घरात भरपूर प्रकाश येत असेल तर, अशा वेळी लाईट बंद ठेवा. याद्वारे तुम्ही वीज बिलात कपात करू शकता.

LED Bulbs चा वापर :

घरातील प्रत्येक खोलीत एलईडी बल्बचा वापर करणे देखील फायद्याचे ठरू शकते. यामुळे बिलातही सुमारे ५० टक्के करता येऊ शकते. यासोबतच तुम्ही वापरत नसलेली इलेक्ट्रॉनिक उत्पादने बंद केल्याने देखील वीज कमी करण्यात मदत मिळू शकते.

वाचा: Smartphone Buying Tips : नवीन स्मार्टफोन खरेदी करतांना ‘या’ गोष्टी ठेवा डोक्यात, नुकसान होणार नाही

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *