वाढदिवशी आलियाचं मोठं स्वप्न पूर्ण… फोटो शेअर अभिनेत्रीनं दिली माहिती


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज वाढदिवस आहे आणि तिचा स्पेशल दिवस आणखी  स्पेशल बनवण्यासाठी आलियाचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ चा फर्स्ट लूक रिविल झाला आहे. या चित्रपटात आलिया ‘ईशा’च्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि आलिया यांनी सोशल मीडियावर आलियाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तिचा हा लूक पाहून चाहत्यांनी आलियावर कौतुकाचा वर्षाव केलाय. तिचा हा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

अयान मुखर्जीला रिप्लाय करत कॅप्शनमध्ये आलियाने स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की आजच्यापेक्षा तिच्या व्यक्तिरेखेची ओळख करून देण्यासाठी दुसरा कोणताही चांगला दिवस नाही. तिने दिग्दर्शक अयान मुखर्जींच अभिनंदन केलय.

‘ब्रह्मास्त्र’ या  बहुप्रतिक्षित चित्रपटात आलिया करत आहे, आलियाचा हा 29वा वाढदिवस आहे, तीचा वाढदिवस जास्त स्पेशल झालाय तो ब्रम्हास्त्रच्या ह्या फर्स्ट लूकने.

पोस्ट केलेल्या या व्हिडियोमध्ये व्हिडीओमध्ये आलिया वेगवेगळ्या रुपात दिसतेय, कधी ती आकाशात धावतेय, तर कधी ती रनबीरच्या कुशीत दिसते, या चित्रपटात आलिया एकदम वेगळ्याच भूमिकेत दिसतेय.

आलीयासाठी ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट एका ड्रिम प्रोजेक्टपेक्षा कमी नाही. त्यामुळे हा व्हिडीओ आलियासाठी एखाद्या स्वप्नपूर्ती पेक्ष कमी नाही. त्याहून महत्वाचे म्हणजे तिचा फस्ट लूक वाढदिवसा दिवशी समोर आल्यानं आलियाला फारच आनंद झाला आहे.

करण जोहरनेसुद्धा सोशल मीडियावर ‘ब्रह्मास्त्र’चा फर्स्ट लूक शेअर करत तिचे तोंड भरून कौतुक केलयं, यासोबतच #AliaBhatt सोशल मीडियावर ट्रेंड करत करतोय. अनेक बॉलीवूड अॅक्टर्सने #AliaBhatt लिहून हा फर्स्ट लूक रिपोस्ट केलाय. वाढदीवशी तीच्या फर्स्ट लूकला जबरदस्त पसंती मिळात आहे.  तिचा नवा लूक पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय देखील या चित्रपटाचा भाग आहेत.  हा चित्रपट याच वर्षी 9 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘ब्रह्मास्त्र’  थ्रीडी इफेक्टसह हिंदीसह तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये  प्रदर्शित होणार आहे.Source link

Leave a Reply