भन्नाट ट्रिक! विना केबल कनेक्शन मोफत पाहू शकता लाईव्ह टीव्ही, ‘हे’ अ‍ॅप येईल खूपच उपयोगी


नवी दिल्ली : टीव्ही पाहायची असेल तर डीटीएच अथवा केबल कनेक्शन असणे गरजेचे आहे. मात्र, तुम्ही एका सोप्या ट्रिकच्या मदतीने विना केबल कनेक्शन मोफत टीव्ही पाहण्याचा आनंद घेऊ शकता. यासाठी Jio TV हे अ‍ॅप तुमच्या खूपच उपयोगी येईल. जिओच्या रिचार्ज प्लान्समध्ये यूजर्सला अनेक अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. या अ‍ॅपद्वारे तुम्ही लाईव्ह टीव्हीचा आनंद घेऊ शकता. या अ‍ॅपवर तुम्ही लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि ऑनलाइन व्हिडिओ पाहू शकता. याद्वारे कोणताही अतिरिक्त खर्च न करता टीव्हीचा आनंद फोनवरच घेता येतो. जिओ या सर्विसला रिचार्ज प्लान्ससोबत मोफत देत आहे. मात्र, Jio TV अ‍ॅपला तुम्ही लॅपटॉप अथवा टीव्हीवर डाउनलोड करू शकत नाही. जिओ सिनेमा मात्र अ‍ॅप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. मात्र, सोप्या पद्धतीने तुम्ही Jio TV अ‍ॅपला मोठ्या स्क्रीनवर वापरू शकता.

PC वर डाउनलोड होईल जिओ टीव्ही अ‍ॅप

या अ‍ॅपला लॅपटॉप अथवा पर्सनल कॉम्प्युटरवर डाउनलोड करण्याची सर्वात सोपी प्रोसेस एम्यूलेटर आहे. तुम्हाला Bluestacks Android Emulator ला पीसीवर इंस्टॉल करावे लागेल. इंस्टॉल केल्यानंतर गुगल प्ले स्टोरवर जा व गुगल अकाउंटने लॉग इन करा. आता तुम्हाला JioTV अ‍ॅप सर्च करून डाउनलोड करावे लागेल. अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर Bluestacks च्या होम स्क्रीनवर दिसेल. जिओ अ‍ॅपला वापरण्यासाठी जिओ नंबरची गरज आहे. जिओ नंबर टाकल्यानंतर ओटीपी टाकून व्हेरिफाय करा. अशाप्रकारे तुम्ही अ‍ॅपला लॅपटॉपवर वापरू शकता.

टीव्हीवर मिळेल JioTV चा अ‍ॅक्सेस

तुम्हाला जर जिओ टीव्ही अ‍ॅपला टीव्हीवर पाहायचे असल्यास यासाठी खूपच सोपी प्रोसेसर आहे. तुम्हाला लॅपटॉपला टीव्हीशी कनेक्ट करावे लागेल. यासाठी HDMI केबलचा वापर करू शकता. यामुळे मोठी स्क्रीनवर जिओ टीव्हीचा आनंद घेता येईल. मात्र, यासाठी लॅपटॉपमध्ये जिओ टीव्ही अ‍ॅप असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही वरील प्रोसेस फॉलो करू शकता. HDMI केबल कनेक्ट केल्यानंतर लॅपटॉप स्क्रीन टीव्हीवर मिरर होईल. टीव्ही आणि लॅपटॉप कनेक्ट झाल्यानंतर टीव्ही रिमोटने HDMI मोड ऑन करा. अशाप्रकारे तुम्ही जिओ टीव्हीवरील कंटेंट टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता.

वाचा: दररोज २GB डेटासह ‘या’ रिचार्जमध्ये कॉल्स आणि Disney+ Hotstar फ्री, अतिरिक्त बेनिफिट्सही जबरदस्त; पाहा डिटेल्स

वाचा: घरबसल्या स्मार्टफोनवरून मिनिटात लिंक करा Aadhaar-PAN, उद्या शेवटचा दिवस; जाणून घ्या प्रोसेस

वाचा: ३१ मार्चनंतर ‘या’ स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही WhatsApp, तुमच्या फोनचा तर समावेश नाही? पाहा संपूर्ण लिस्ट

वाचा: Gmail वर ‘असा’ पाठवा सीक्रेट मेसेज, कुणालाच माहित होणार नाही, पाहा ‘ही’ सोप्पी ट्रिक

Source link

Leave a Reply