Usain Bolt Fraud: उसेन बोल्टची 98 कोटींची आर्थिक फसवणूक; वेगाचा बादशाह झाला कंगाल!


Usain Bolt Investment Fraud: जगतील सर्वात वेगवान व्यक्ती अशी ओळख असलेला धावपटू उसेन बोल्टला (World’s Fastest Man Usain Bolt) मोठा आर्थिक फटका बसला आहे. बोल्टने आयुष्यभर कमवलेले जवळजवळ सर्व पैसे काही क्षणांत चोरीला गेले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बोल्टच्या (Usain Bolt) मालकीचे 98 कोटी ($10 million) रुपये एका खासगी गुंतवणूक खात्यात ठेवले होतो. याच खात्यावर डल्ला मारण्यात आला आहे.

उरले केवळ 1 लाख 62 हजार रुपये

जमैकामधील खासगी गुंतवणूक कंपनीच्या खात्यावरुन पैसे चोरीला गेले आहेत असं बोल्टच्या वकिलांनी सांगितलं आहे. बोल्टचं हे खातं किंग्स्टन, जमैका स्टॉक्स अॅण्ड सिक्युरिटीज लिमिटेड (Stocks and Securities Limited (SSL)) या खासगी कंपनीत होतं. बोल्टकडे आता केवळ 2 हजार डॉलर्स (1 लाख 62 हजार रुपये) शिल्लक राहिले आहेत. या प्रकरणाची आता जमैकामधील फायनॅनशिअल सर्व्हिस कमिशनकडून (Jamaican Financial Services Commission) केली जात आहे, असं वृत्त ‘जमैका ऑबझर्व्हर’ने दिलं आहे.

कधीच काढले नव्हते पैसे

बोल्टने 10 दिवसांमध्ये हे पैसे मला मिळवून द्यावेत अशी मागणी कंपनीकडे केली आहे. कंपनीने वेळेत पैसे परत केले नाही तर बोल्ट या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे. ऑलिम्पिकमध्ये आठ मेडल्स जिंकणारा बोल्ट हा 2018 मधील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत 45 व्या क्रमांकावर होता. त्यावेळेस तो दर महिन्याला एक मिलियन डॉलर्सची कमाई करायचा. बोल्टने 2012 साली या कंपनीमध्ये खातं सुरु होतं होतं. बोल्ट सातत्याने यामध्ये पैसे गुंतवायचा. मात्र त्यामधून त्याने मागील 10 वर्षांमध्ये कधीच पैसे काढले नव्हते अशी माहितीही समोर आली आहे.

कंपनीने दिली कबुली

एका स्थानिक आर्थिक सल्लागाराने सुरु केलल्या या कंपनीच्या माध्यमातून बोल्टप्रमाणेच अन्य 30 जणांचीही फसवणूक करण्यात आल्याचं उघड झालं आहे. आमच्या कंपनीतील खात्यांवर डल्ला मारणाऱ्यांना पकडण्यात आम्हाला अपयश आल्याचं या कंपनीने मान्य केलं आहे. तसेच फसवणूक झालेल्यांमध्ये बोल्टचाही समावेश असल्याची आम्हाला कल्पना नाही असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. बोल्टने ऑक्टोबर 2022 पर्यंत हे पैसे खात्यावर होते असं म्हटलं आहे. कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भातील नोटीस बोल्टने या कंपनीला पाठवली असून 10 दिवसांचं अल्टीमेट दिलं आहे.

फसवणूक करणारा कर्मचारीच?

‘जमैका ऑबझर्व्हर’ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या फसवणुकीसाठी जबाबदार असलेला कंपनीतील कर्मचारी अजूनही कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यानेच फसवणूक केल्याचं कंपनीशी संबंधित सुत्रांनी म्हटलं आहे. सध्या जमैकामधील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत.

ऑलिम्पिकचा गोल्डन बॉय

बोल्टने चीनमध्ये 2008 साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आपल्या करियरमधील पहिलं ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलं होतं. चीनमध्ये त्याने 100 आणि 200 मीटर शर्यतीत पदकं जिंकली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने 100, 200 आणि 4X100 मीटर शर्यतीतही सुवर्ण पदक पटकावलं होतं. अशीच कामगिरी बोल्टने रियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये केली होती. त्याने आपल्या करियमध्ये एकूण 8 सुवर्ण पदकं जिंकली आहेत. त्याशिवाय बोल्टने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 11 सुवर्ण पदकं जिंकली आहेत.Source link

Leave a Reply